vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनाचा थकित निधी शेतक-याच्‍या खात्‍यावर जमा करून नमो शेतकरी महासन्‍मान योजना पूर्ववत चालू करा… बाबासाहेब कोलते

नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनाचा थकित निधी शेतक-याच्‍या खात्‍यावर जमा करून नमो शेतकरी महासन्‍मान योजना पूर्ववत चालू करा… बाबासाहेब कोलते

जालना (प्रतिनिधी) – राज्‍य शासनाने सुरू केलेल्‍या नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनेचा थकित निधी गेल्‍या एक वर्षापासून शेतक-याला मिळाला नसून तो तात्‍काळ शेतक-याच्‍या खात्‍यावर जमा करून नमो शेतकरी महासन्‍मान योजना पूर्ववत चालू ठेवण्‍याची मागणी स्‍वातंत्र्य सैनिक पाल्‍य युवक समितीचे प्रदेशाध्‍यक्ष बाबासाहेब पाटील कोलते यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्‍याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्‍यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्‍या निवेदनात बाबासाहेब कोलते यांनी म्‍हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्‍ट्रातील व भारत देशातील सर्व शेतक-यांसाठी पंतप्रधान किसान सन्‍मान योजना ही अल्‍पभूधारक शेतक-यांसाठी सुरू केली असून देशातील प्रत्‍येक शेतक-याला एका वर्षाला 6000/- रुपये म्‍हजणे प्रत्‍येकी चार महिन्‍याला रुपये 2000/- चा हप्‍ता केंद्र शासनाकडून दिला जातो. केंद्र शासनाच्‍या धर्तीवरच महाराष्‍ट्र राज्‍यातील अन्‍नदाता बळीराजाच्‍या उत्‍पन्‍न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजना तत्‍कालीन भाजपा-शिवसेना महायुतीचे मुख्‍यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सुरू केली होती. परंतु राज्‍य सरकारची ही नमो शेतकरी महा सन्‍मान योजनेचा फक्‍त एक वर्षासाठीच त्‍याचा शेतकरी बांधवांना लाभ मिळाला असून गेल्‍या एक वर्षापासून राज्‍य शासनाच्‍या नमो शेतकरी महा सन्‍मान योजनेचा निधी प्रत्‍येकी चार महिन्‍याला रुपये 2000/- म्‍हणजे वार्षिक रुपये 6000/- मिळालेला नाही.

केंद्र शासनाप्रमाणे राज्‍य शासनाने सुद्धा महाराष्‍ट्र राज्‍यातील अन्‍नदाता बळीराजाच्‍या उत्‍पन्‍न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनेचा थकित निधी तात्‍काळ शेतक-यांच्‍या खात्‍यावर जमा करावा व केंद्र सरकारप्रमाणे राज्‍य सरकाने सुद्धा नमो शेतकरी महासन्‍मान योजना पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी बाबासाहेब कोलते यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

रेणापूर तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी श्री. सतीश आंबेकर यांची नियुक्ती… 👏🏻🎉

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा यांच्यात नाशिक बैठकीत वाद विवाद तुफान राडा, नेते बैठक सोडून गेले

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस निवड झालेल्या उमेदवारांचे मंत्री दादाजी भुसे यांनी केले अभिनंदन

शासकीय योजनांच्या लाभासाठी समन्वय यंत्रणा म्हणून पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन उपयुक्त ठरेल      – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईनचे उद्‌घाटन- सेवा, सुशासन, गरीब कल्याणाचे उद्दिष्ट गतिशील करण्याचा हेतू- हेल्पलाईन संपर्क क्रमांक 8808806088064

कृपया प्रसिद्धीसाठी !महाराष्ट्र मंदिर महासंघामुळे कोट्यवधीची मंदिराची जमीन बिल्डर लॉबीच्या घशात जाण्यापासून वाचली सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन अवघ्या९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश अखेर रद्द!* उपविभागीय अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर आदेश अखेर रद्द !* अमरावतीतील ऐतिहासिक सोमेश्वर महादेव देवस्थानची मालकी अबाधित !

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta