vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” 2026 अतंर्गत आयोजीत रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जालना येथे 29 सप्टेंबरला रोजगार महाकुंभ; युवकांना रोजगाराच्या संधी…

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” 2026 अतंर्गत आयोजीत रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जालना येथे 29 सप्टेंबरला रोजगार महाकुंभ; युवकांना रोजगाराच्या संधी…

 

जालना, प्रतिनिधी : देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र २०२६’ या राज्यव्यापी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभर एकाच दिवशी ८०० रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. जालना जिल्ह्यातील रोजगार महाकुंभाचे आयोजन 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), जालना येथील वर्कशॉप क्रमांक 2 मध्ये करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात दहावी व बारावी उत्तीर्ण उमेदवार, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवीधर व पदव्युत्तर उमेदवार, डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीधारक, अल्पमुदतीचे कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार, आयटीआय उत्तीर्ण तसेच अंतिम वर्षातील प्रशिक्षणार्थी आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या पात्र युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे.

विविध खासगी आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पात्र उमेदवारांसाठी 21 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे दोन सत्रांमध्ये रोजगारपूर्व तयारी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांनी 29सप्टेंबर रोजी आयोजित रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे, जेणेकरून त्यांना विविध आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील

जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, जालना ए. ए. केसकर तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथील प्राचार्य ए. ए. आलटे यांनी केले आहे.

****

संबंधित पोस्ट

मुंबईतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात; मुंबईकरांचे सहकार्य आणि प्रशासकीय यंत्रणेचे काम कौतुकास्पद : मंत्री मंगलप्रभात लोढा

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरळी सी फेसवर ‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर येथे 25 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा*

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती! ५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महाराष्ट्र शासनाने श्रीगणेशोत्सव हा राज्य महोत्सव स्वरूपात व्यापक प्रमाणात साजरा करण्याचे जाहीर केले असून त्या अनुषंगाने,

राज्यात बॉम्बस्फोट करण्याची धमकीचा संदेश; मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला धमकीचा ईमेल भारत-पाकिस्तान तणाव परिस्थीतीदरम्यान मुंबई हाय अलर्ट..