vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डाक विभागाची सांगलीत 6 जुलैला पेंशन अदालत

डाक विभागाची सांगलीत 6 जुलैला पेंशन अदालत

            सांगली, प्रतिनिधी: भारतीय डाक विभागाची विभागीय स्तरावरील सहामाही पेंशन अदालत दि. 6 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक डाकघर सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली    जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, अशा वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारींचे 3 महिन्यांच्या आत निवारण झालेले नसेल तर अशा प्रकरणांचा या पेंशन अदालत मध्ये विचार केला जाणार आहे. पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे, ई वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन, टीबीओपी /एमएसीपी पदोन्नती वेतन श्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डीपीसी च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्तीवेतनधारक विहित नमुन्यातील अर्ज प्रवर अधीक्षक डाकघर सांगली विभाग, यांचे कार्यालय, सांगली प्रधान डाकघर इमारत, राजवाडा चौक, सांगली -416416 यांच्या नावे दि. 2 जुलै 2026 रोजी किंवा तत्पूर्वी वैयक्तिक रूपाने पाठवू शकतात. दिनांक 2 जुलै नंतर मिळालेल्या अर्जावर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नसल्याचे प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामांतर*

जगात ज्ञान हीच संपत्ती- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

vishwatmaklokswamivarta

अंतराळ संशोधन संस्थेतील शैक्षणिक सहलीसाठी  348 विद्यार्थ्यांनी दिली निवड चाचणी परीक्षा…

vishwatmaklokswamivarta

चारित्र्यनिर्मिती हाच भक्कम नेतृत्वाचा पाया – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन-२९ व्या भारतीय युवा संसद परिषदेचे उद्घाटन

वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका बारा वर्षाच्या बालिकेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय तीन आरोपी अटक .

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर; पालघरमध्ये ‘माउंटन टनेल-६’चे खोदकाम पूर्ण

vishwatmaklokswamivarta