vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

निरोगी दीर्घायुष्यासाठी सायकल चालविणे हितकारक- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे

निरोगी दीर्घायुष्यासाठी सायकल चालविणे हितकारक- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे

            सांगली, प्रतिनिधी: निरोगी दीर्घायुष्य जगण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामासाठी सायकल चालविणे सर्वांसाठी हितकारक आहे. त्यामुळे प्रदूषणही कमी होते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी आज येथे केले.     महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली, वकील संघटना व जिल्हा व सत्र न्यायालय सांगली, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सांगली यांच्या वतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश क्र. 2 एस. आर. पडवळ, तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्र. 2 एम. एस. काकडे, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एन. शे‌ट्टी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे, इतर न्यायिक अधिकारी, सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अशोक वाघमोडे व उपाध्यक्ष महावीर गायकवाड, वकील संघटनेचे पदाधिकारी तसेच जिल्हा न्यायालय सांगली व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सांगली येथील कर्मचारी उपस्थित होते.

  यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सांगली यांच्या निवासस्थानापासून ते जिल्हा व सत्र न्यायालय कार्यालय विजयनगर, सांगली या मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हा मुख्यालयातील न्यायाधीश, वकील व कर्मचारी तसेच सायकलपटू संतोष शिंदे व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    कार्यकमाचे नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. प्रबंधक महेश गुर्लहसुर, डी. डी. कुंभार, अधिक्षक व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांचे अधीक्षक, शंकरराव वानखडे, संतोष खंदारे, नितीन आंबेकर व कर्मचारी यांनी पार पाडले.

000000

00000

संबंधित पोस्ट

रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सन्मान व समारोप समारंभ संपन्न

विधानसभा प्रश्नोत्तर :आशा, स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मानधनाची प्रक्रिया सुरू- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्गम भागातील रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावी- ॲड. आशिष जयस्वाल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

युद्ध पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन कार्य केंद्र 24X7 कार्यरत ठेवावे*– *निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के*

महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राज्य आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी(दि.१४) जनसुनावणी

vishwatmaklokswamivarta