vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भय्यासाहेब आंबेडकर : फुले-आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील दुर्लक्षित पान: डॉ. संजय मून

भय्यासाहेब आंबेडकर : फुले-आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील दुर्लक्षित पान: डॉ. संजय मून

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : फुले-आंबेडकरी चळवळीचा इतिहास हा केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यापुरता मर्यादित नसून, त्यांच्या विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाचा वारसा पुढे नेणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या योगदानातून तो घडला आहे. या इतिहासातील एक महत्त्वाचे, मात्र तुलनेने दुर्लक्षित राहिलेले पान म्हणजे सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांचे कार्य होय. भय्यासाहेबांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपण्याबरोबरच आंबेडकरी चळवळीला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची नव्या पिढीसमोर मांडणी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राचार्य डॉ. संजय मुन यांनी केले.

सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन तक्षशिला बुद्ध विहार, रामनगर, एन-२, सिडको, जालना रोड येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिक्खू ईद्धीपय्यो होते. तर विचारमंचावर ज्येष्ठ साहित्यिक भीमराव सरवदे, डॉ.यशवंत खडसे,कॉ. भीमराव बनसोड, डॉ. धनराज गोंडाणे,आसाराम गायकवाड,अरविंद अवसरमोल, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा भारत शिरसाट आदी उपस्थित होते.

डॉ.संजय मुन पुढे बोलताना म्हणाले की, भय्यासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या पिढीतील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. बाबासाहेबांच्या पश्चात निर्माण झालेल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत आंबेडकरी समाजाला संघटित ठेवणे, चळवळीचा विचार पुढे नेणे आणि सामाजिक परिवर्तनाची भूमिका जिवंत ठेवणे हे मोठे आव्हान होते. या कालखंडाचा अभ्यास करताना भय्यासाहेबांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

आंबेडकरी चळवळीसमोरील संघटनात्मक आव्हानांचा उल्लेख करताना डॉ. मुन यांनी १९५७ ते १९५९ पासून सुरू झालेल्या रिपब्लिकन पक्षातील फुटीला आजपर्यंत आळा घालता आलेला नाही; आजही फाटाफूट सुरूच आहे, अशी खंत व्यक्त केली. चळवळीतील मतभेदांपेक्षा सामाजिक परिवर्तनाचा व्यापक विचार आणि बाबासाहेबांचे समतेचे तत्त्वज्ञान केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक करताना सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत सिरसाट बोलताना म्हणले की, भय्यासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा नव्याने अभ्यास करण्याची गरज आहे, नव्या पिढीने केवळ स्मरणदिनापुरते भय्यासाहेबांना अभिवादन न करता त्यांच्या कार्याचा चिकित्सक अभ्यास करावा. भय्यासाहेबांचा इतिहास केवळ एका व्यक्तीचा इतिहास नसून, बाबासाहेबांच्या विचारांच्या संक्रमणाचा आणि आंबेडकरी चळवळीच्या पुढील वाटचालीचा इतिहास आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव अँड आनंद चक्रनारायण यांनी केले.तर आभार तक्षशीला बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष आसाराम गायकवाड यांनी मानले.

   या कार्यक्रमांस डॉ रेखा मेश्राम, सुधाकर मकसरे,के टी उपदेशे, रतनकुमार साळवे, रत्नाकर खंडागळे,रामभाऊ पेटकर, सी पी पाटील, भीमराव गाडेकर, सुरेश शिरसाट,मधुकर गवंदे, सिद्धार्थ धांडे,अमरदीप वानखडे, कवी देवानंद पवार आदी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

अखेर अभिनेते नाना पाटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी निर्माता आणि राकेश सारंग दिग्दर्शक यांना न्याय मिळाला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत १०० टक्के कामकाज पूर्ण

आयडिएशन कॉम्पिटिशन ३.०’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

राज्यात वाळू वाहतुकीसाठी २४ तास परवानगी- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सिपेटमध्ये बेरोजगार युवक, युवतींसाठी निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी आज मनसेच्या विभाग अध्यक्षांच्या बैठकीत दिला