vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सिपेटमध्ये बेरोजगार युवक, युवतींसाठी निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

सिपेटमध्ये बेरोजगार युवक, युवतींसाठी निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी) :- राज्यातील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी), अपंग (पीडब्लुडी) व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या (इडब्लुएस) प्रवर्गातील युवक व युवतींकरीता प्लॅस्टिक प्रोसेसिंग तंत्रज्ञान संबधी 4 महिने कालावधीच्या नि:शुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता (निवासी) केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्था (सिपेट) या रसायन व पेट्रोरसायन विभाग, रसायने व खत मंत्रालय भारत सरकार च्या अंतर्गत संस्थेमार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत.

प्रशिक्षणार्थीची निवड 24 नोव्हेंबर, 2025 रोजी सिपेट, छत्रपती संभाजीनगर येथे मूळ कागदपत्रांची तपासणी करून व मुलाखती द्वारे करण्यात येणार आहेत. मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता कोणताही प्रवास भत्ता किंवा शुल्क दिले जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांची 26 नोव्हेंबर,2025 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्जाचा नमुना www.cipet.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध आहे. तरी प्रशिक्षणास इच्छूक पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून व आवश्यक सर्व शैक्षणिक कागदपत्र (साक्षांकित प्रती), फोटोसहित सिपेट – छत्रपती संभाजीनगर पत्त्यावर पाठविण्यात यावे. अधिक माहितीसाठी: 9325687910, 9601364550, 9145675585 या क्रमांकावर अथवा vtc-aurangabad@cipet.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा

या निवासी कौशल्य विकास प्रशिक्षणाचे प्रायोजक सॅबीक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसआयपीएल) हे आहेत. सिपेट भारत सरकारची प्लॅस्टिकमध्ये प्रशिक्षण देणारी अग्रणी संस्था असुन सॅबीक इंडिया प्रायव्हेट लि. (एसआयपीएल) हरियाणा यांच्या सहाय्याने सीएसआर अंतर्गत मशिन ऑपरेटर – प्लॅस्टिक प्रोसेसिंग (एमओ-पीपी) कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थींना प्लॅस्टिक प्रोसेसिंग तंत्रज्ञान संबधी प्रशिक्षण दिले जाते. ज्यामुळे त्यांना नामांकित उद्योगामध्ये रोजगार प्राप्त करता येईल. या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण 4 महिने (600 तास) असून 55 जागा असणार आहे. यासाठी वयोमर्यादा 18-30 वर्षे राहणार आहे. प्रशिक्षणासाठी निवड होण्यासाठी 11 वी उत्तीर्ण किंवा 10 वी उत्तीर्ण आणि 1.5 वर्षाचा संबंधित अनुभव किंवा 8 वी उत्तीर्ण आणि 4.5 वर्षाचा संबंधित अनुभव किंवा संबंधित एनएसक्युएफ स्तर 3 आणि 1.5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. प्रशिक्षणाच्या निवडीसाठी वयोमर्यादा अनुसूचीत जाती, जमाती करीता 05 वर्ष आणि इतर मागासवर्गीयांकरीता 03 वर्ष शिथील असणार आहे.

निवासी प्रशिक्षणाकरीता पात्र प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क राहण्याची व जेवणाची व्यवस्था असणार आहे. यापूर्वी सिपेट -छत्रपती संभाजीनगर येथून प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी पात्र असणार नाहीत

संबंधित पोस्ट

अयोध्येत राम लल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडताच कलाकारांनी साजरा केला आनंदोत्सव; राजपाल यादवने केला डान्स, तर कंगनाने दिल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा..

vishwatmaklokswamivarta

आंध्रप्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा करिष्मा दिसेल-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

vishwatmaklokswamivarta

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन

पंतप्रधान इंटर्नशिप योजना’, लाभ घेण्याचे आवाहन