vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जालना महानगराच्या वतीने भव्य रक्तदान,समाजसेवाच देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची खरी ओळख-भास्कर आबा दानवे

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जालना महानगराच्या वतीने भव्य रक्तदान,समाजसेवाच देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची खरी ओळख-भास्कर आबा दानवे

 

जालना/प्रतिनिधी : महाराष्ट्राचे लोकप्रिय व विकासाभिमुख मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जालना महानगरच्या वतीने जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील चार ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

मंडळ अध्यक्ष महेश निकम (मुक्तेश्वर लॉन्स, जुना जालना), सुनील खरे (बाथ्री तेली पंचायत भवन, नवीन जालना), अमोल धानुरे (रुपम हॉल, पूर्व जालना) आणि संजय डोंगरे (रामनगर सा.का., ग्रामीण) यांच्या नेतृत्वाखाली शहरातील चार ठिकाणी रक्तदान शिबिरे उत्साहात पार पडली. या शिबिरांमध्ये नागरिक, युवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकूण २३५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश दिला.

यावेळी बोलताना भाजप जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नेहमीच समाजहिताला प्राधान्य देत विकासाभिमुख आणि जनकल्याणकारी शासन दिले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा समाजोपयोगी उपक्रम राबविणे हेच त्यांना खरी शुभेच्छा, रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. भारतीय जनता पार्टी ही केवळ राजकीय पक्ष नसून समाजसेवा हेच आपले प्रमुख ध्येय मानणारी संघटना आहे आणि अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजाप्रती आपली बांधिलकी कायम जपली जाईल.

या रक्तदान शिबिराला कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत

संबंधित पोस्ट

डाक जीवन विमा योजनेचे प्रीमिअम भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा..

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील लालबागचा मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती येथून थेट गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या आपल्या वेबसाईट पोर्टलला आपल्या सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

धरणातील गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी यांचे निर्देश

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे,दुर्घटनाग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी समोर आलेली आहे.

vishwatmaklokswamivarta

आरटीई २५ टक्के जागांच्या नोंदणीला सुरुवात-रायगडातील २६६ शाळांमध्ये ४ हजार ५७८ जागा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील – पालकमंत्री चंद्रकांत पाटील पलूस तालुक्यासाठीच्या ८ यांत्रिक बोटींचे औदुंबर येथे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta