vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उन्हाळी सुट्टीत एसटीचा प्रवास भाडे रकमेत हंगामी भाडेवाढ-अमरावती विभागाकडून साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के वाढ

उन्हाळी सुट्टीत एसटीचा प्रवास भाडे रकमेत हंगामी भाडेवाढ-अमरावती विभागाकडून साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के वाढ

 

अमरावती, प्रतिनिधी: उन्हाळी सुट्ट्या, सण-उत्सव आणि लग्नसराईच्या काळात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 15 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून 15 जून 2026 पर्यंत कायम राहणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महामंडळाला गर्दीच्या काळात 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिली आहे, त्याअंतर्गत अमरावती विभागाचे सक्षम प्राधिकारी यांनी ही 10 टक्के दरवाढ मंजूर केली आहे.

या निर्णयामुळे साध्या बसचा सध्याचा 10.05 रुपये प्रति टप्पा दर आता 11.05 रुपये इतका होईल. अमरावती येथून विविध महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सुधारित दरपत्रकानुसार, अमरावती ते नागपूर प्रवासासाठी आता 290 रुपये (आधी 262), अमरावती ते धारणी 268 रुपये (आधी 242) आणि अमरावती ते अकोला 191 रुपये (आधी 172) मोजावे लागतील. तसेच परतवाडा, दर्यापूर आणि मोर्शी या मार्गांसाठी 91 रुपयांऐवजी 102 रुपये भाडे आकारले जाईल.

महत्त्वाची बाब म्हणजे ही भाडेवाढ केवळ ‘साध्या बस’ प्रकारासाठीच लागू असून, महामंडळाच्या इतर प्रगत सेवांचे दर पूर्वीप्रमाणेच स्थिर राहणार आहेत. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन अमरावती विभागाचे नियंत्रक सचिन डफळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि प्रवाशांना सेवा देण्यासाठी ही दरवाढ आवश्यक असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु

vishwatmaklokswamivarta

विविध कृषि पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ   

१५० दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स’ कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून अभिनंदन २०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राने स्वच्छतेच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत *भारताच्या सर्वात ‘स्वच्छ राज्य’चा प्रतिष्ठेचा किताब पटकावला! राज्यातून – 1 सेवन स्टार, 2 फाइव स्टार, 82 वन स्टार गार्बेज फ्री शहरांचा दर्जा आणि 261 ओडीएफ़ प्लस प्लस शहरांचा मान मिळाला

राऊळगाव दुर्घटनेतीन मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ८२ लक्ष रुपयांची मदत – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जखमींना २५ लक्ष रुपये देण्याचे निर्देश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन