vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निलंगा नगरपरिषदेसाठी 67.37, तर रेणापूर नगरपंचायतीसाठी 80.51 टक्के मतदान,उदगीरमध्ये तीन जागांसाठी 58.22 टक्के मतदान,जिल्ह्यातील 4 नगरपरिषद, 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी आज 21 डिसेंबर रोजी मतमोजणी

निलंगा नगरपरिषदेसाठी 67.37, तर रेणापूर नगरपंचायतीसाठी 80.51 टक्के मतदान,उदगीरमध्ये तीन जागांसाठी 58.22 टक्के मतदान,जिल्ह्यातील 4 नगरपरिषद, 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी आज 21 डिसेंबर रोजी मतमोजणी

 

लातूर, प्रतिनिधी: जिल्ह्यातील निलंगा नगरपरिषद निवडणुकीसाठी 67.37, तर रेणापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी 80.51 टक्के मतदान झाले. तसेच उदगीर नगरपरिषदेच्या तीन जागांसाठी 58.22 टक्के मतदान झाले.

निलंगा नगरपरिषदेसाठी झालेल्या मतदानामध्ये 16 हजार 429 पैकी 11 हजार 259 पुरुष मतदारांनी, तर 15 हजार 756 पैकी 10 हजार 424 महिला मतदारांनी म्हणजेच एकूण 32 हजार 185 पैकी 21 हजार 683 मतदारांनी मतदान केले

रेणापूर नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत 8 हजार 420 पैकी 6 हजार 856 पुरुष मतदारांनी, तसेच 7 हजार 857 पैकी 6 हजार 249 महिला मतदारांनी म्हणजेच एकूण 16 हजार 277 मतदारांपैकी 13 हजार 105 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

उदगीर नगरपरिषद निवडणुकीसाठी आज झालेल्या तीन जागांच्या मतदानात 6 हजार 121 पैकी 3 हजार 694 पुरुष मतदारांनी, तसेच 5 हजार 886 पैकी 3 हजार 297 महिला मतदारांनी म्हणजेच एकूण 12 हजार 7 मतदारांपैकी 6 हजार 991 मतदारांनी मतदान केले.

जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा नगरपरिषद व रेणापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून रविवार, 21 डिसेंबर रोजी सकाळी दहा पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

संबंधित पोस्ट

ऐरोली विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या मॅपिंगसाठी विशेष मोहीम; २००२ च्या मतदार यादीशी होणार पडताळणी*

जालना शहर महानगरपालिका व पतंजली योग शिबीर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबीरास प्रारंभ०७ फेब्रुवारी पर्यंत राहणार शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अकोले येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, आवश्यक पदांना मान्यता

पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांना प्राधान्य द्या – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील पुनर्वसन धोरण नव्याने करणार

ठाणे शहरात ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई

7 हजारहून अधिक नागरिकांच्या एकत्रित सहभागातून सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर सखोल महास्वच्छता मोहीम यशस्वी..जोरदार पावसाची पर्वा न करता नवी मुंबईकरांनी जपली स्वच्छतेविषयी बांधिलकी

vishwatmaklokswamivarta