vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यात शहरी भागात ८३२ “आपले सरकार सेवा केंद्र सुरू करणेबाबत जाहिरात प्रसिद्ध इच्छुकांनी दि. १ ते ३० सप्टेंबर दरम्यान अर्ज करावेत

ठाणे जिल्ह्यात शहरी भागात ८३२ “आपले सरकार सेवा केंद्र सुरू करणेबाबत जाहिरात प्रसिद्ध इच्छुकांनी दि. १ ते ३० सप्टेंबर दरम्यान अर्ज करावेत

ठाणे, प्रतिनिधी: ठाणे जिल्ह्यातील शहरी भागातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात रिक्त असलेल्या एकूण ८३२ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी शासनाच्या विविध निर्देश व मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिन राहून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या केंद्रांच्या लिलावासाठी किंवा वाटपासाठी दि. ०१ सप्टेंबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

सामान्य प्रशासन विभाग व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या शासन निर्णयानुसार, अर्जदारांनी दिलेल्या https://forms.gle/fv7WjWuEUT7eN14E8 या ऑनलाईन लिंकवर विचारलेली सर्व माहिती मराठी भाषेत अचूक भरणे बंधनकारक आहे. अर्ज सादर झाल्यानंतर अर्जदाराच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर अर्जीची प्रत प्राप्त होईल. प्राप्त झालेली प्रिंट काढून त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रे स्वतः साक्षांकित (स्वयं-साक्षांकित) करून, संबंधित तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे दि. ०१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी कार्यालयीन वेळेत (सकाळी ९:४५ ते संध्याकाळी ६:१५ वा.) प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे.

क्षेत्रनिहाय रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:ठाणे : २४५, नवी मुंबई : ९२, मिरा-भाईंदर : १२५, भिवंडी-निजामपूर : १०५, कल्याण-डोंबिवली : १८८, उल्हासनगर : ५१, अंबरनाथ : १२, बदलापूर : १४, शहापूर : निरंक, मुरबाड : निरंक, एकूण रिक्त केंद्र: ८३२

           या जाहिरातीसंदर्भातील सविस्तर अटी, शर्ती व मार्गदर्शक तत्त्वांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://thane.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, इच्छुक नागरिकांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

बुलढाणा तालुक्यातील 66 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत

आमदार धिरज लिंगाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून 1 कोटी 10 लक्ष रुपयाचे शैक्षणिक साहित्याचे वाटपजिल्ह्यातील शाळेत यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य दरवर्षी वाटप करु : आ. धिरज लिंगाडे

S.S.C परीक्षेत नमुंमपा इटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण केंद्राचा निकाल १००%

परदेश अभ्यास दौरा कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा –जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना आज दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर