vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन,· ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन,· ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५

लातूर, प्रतिनिधी): महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या लातूर जिल्हा कार्यालयामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजने अंतर्गत ९०, बीज भांडवल योजने अंतर्गत ९० आणि थेट कर्ज योजने अंतर्गत ३८ कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत https://mahadisha.mpbcdc.in/schemes या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, व्यवसायाचे परवाना (लायसन्स) आदी कागदपत्रांची छायांकित प्रत सादर करावी. या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुकांनी विहित कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

*****

संबंधित पोस्ट

जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरीत रामराज्याचा जागर : विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांचा सहभाग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात भव्य हिंदू एकता दिंडी !

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण ११ हजार १९७ प्रकरणे निकाली**१६ कोटी ६० लाख १४ हजार ९६६ रुपयाची तडजोड रक्कम वसूल*

सुभेदारीच्या व्हीव्हीआयपी सुट चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मानवरत्नांच्या हस्ते श्री क्षेत्र कपिलधार येथील ३० व्या राज्यव्यापी मेळाव्यात पुरस्काराचे वितरण होणार”‘शिवा संघटनेचे २०२५ चे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर’ … प्रा. मनोहर धोंडे

vishwatmaklokswamivarta

प्राचार्य राजाराम राठोड अनंतात विलीन.. तांडा वाड्यातील अनेकांच्या स्वप्नांना शिक्षणाचे पंख देणारे प्राचार्य राठोड सदैव स्मरणात राहतील- मंत्री संजय राठोड

जुलै 2025 मधील नमुंमपा पदभरती परीक्षेच्या निकालाचा मार्ग मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाने खुला30 संवर्गाचे स्कोअर कार्ड 11 सप्टेंबरला होणार महापालिका संकेतस्थळावर जाहीर,सद्यस्थितीत करार पध्दतीने कार्यरत कर्मचा-यांची पदे वगळून उर्वरित पदांवर देता येणार नेमणुका

vishwatmaklokswamivarta