vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्ह्यात ११ तूर खरेदी केंद्र कार्यान्वित

जिल्ह्यात ११ तूर खरेदी केंद्र कार्यान्वित

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- आधारभूत दरानुसार महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) मार्फत तुर खरेदीसाठी जिल्ह्यात ११ खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तूर खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या पिकाची नोंदणी करुन शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर न्यावा,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही.यु. राठोड यांनी केले आहे.जिल्ह्यात तूर खरेदीसाठी छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, पाचोड, शिवना, विहामांडवा अशा ११ ठिकाणी तुर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. तुर खरेदीकरीता शेतकरी नोंदणी २४ जानेवारीपासून करण्यात येत असून प्रत्यक्षात तूर खरेदी १३ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. खरेदी १३ मे पर्यंत सुरु राहणार आहे. तरी सर्व शेतकर बांधवांनी आपला सातबारा उतारा, पीक पेरा, आधारकार्ड व बॅंक पासबुक घेऊन जावे आपल्या पिकाची नोंदणी करुन घ्यावी त्यानंतर एसएमएस प्रप्त झाल्यावर शेतमाल खरेदीकेंद्रावर न्यावा,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही.यु. राठोड यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्याने आदिवासी समाज नव्या तेजाने उभा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार मायाताई इवनाते नागरी सत्कार समारंभ

कामगारांची उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 68 उमेदवारांची निवड

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आज 30 जून ते 1 जुलै 2025 या कालावधीत उत्तर प्रदेश (बरेली आणि गोरखपूर)ला भेट देतील.

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलावर सामुहीक योग शिबिराचे आयोजन

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta