vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

न्यायालयातील हिरकणी कक्षाचे उद्घाटन

न्यायालयातील हिरकणी कक्षाचे उद्घाटन

जालना, प्रतिनिधी :- जालना येथील मुख्य न्याय दंडाधिकारी जालना न्यायालयाच्या प्रांगणातील ‘हिरकणी कक्षा’चे उद्घाटन आज जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांच्या हस्ते संपन्न झाले.

       न्यायालयीन महिला अधिकारी, महिला कर्मचारी व न्यायालयात कामानिमित्त येणाऱ्या महिला, विशेषतः लहान बालकांसह येणाऱ्या मातांसाठी सुरक्षित व सुसज्ज जागेची गरज ओळखून हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

  यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते, प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती शेख, मुख्य न्याय दंडाधिकारी सीमा पाडोळीकर, श्रीमती तारू, श्रीमती दुगावकर, रोहिना अंजुम, श्रीमती मुजावर, श्रीमती शिंदे, श्रीमती कदम, वकील संघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिरुद्ध घुले, जिल्हा सरकारी वकील ॲड. बाबासाहेब इंगळे, कोर्ट मॅनेजर पंकज जैन, प्रबंधक श्री. कुलकर्णी, अधिक्षक श्री.जोशी, विजय बावकर, एम.डी.गायकवाड,श्री. शेटे, श्री, साबळे यांच्यासह न्यायालयीन महिला न्यायाधीश व कर्मचारी उपस्थित होते.

       हिरकणी कक्षामध्ये स्तनपानासाठी स्वतंत्र जागा, बसण्याच्या योग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्था तसेच मुलांसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे न्यायालयात येणाऱ्या महिलांना दिलासा मिळणार असून त्यांच्या अडचणी कमी होणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांच्या हस्ते हिरकणी कक्षाच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मृद नमुने तपासणी केंद्र सुरू करण्याकरीता मिळणार अनुदान युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन

रानभाज्यांना राजश्रय देऊन गडचिरोली ब्रँड निर्माण करण्याची गरज – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात रानभाज्यांचे संवर्धन व विपणनावर भर

नेत्रदानाच्या चळवळीत सहभाग नोंदवा- अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभिषन सारंगकर

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे नियोजन प्राधान्याने करा – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

गुगल एआय हब भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी आमूलाग्र बदल घडवणारे ठरेल असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले अधोरेखित, यामुळे एआय-फर्स्ट पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा आणि उच्च-मूल्य असलेल्या रोजगार निर्मितीला चालना मिळेल विशाखापट्टणममध्ये गुगलने 15 अब्ज डॉलर्सच्या एआय हबची घोषणा केली – विकसित भारत दृष्टिकोनाशी सुसंगत एआय-चालित सेवांना चालना देण्यासाठी भारतातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे

vishwatmaklokswamivarta

पॅनल पध्दतीने प्रथमत:च मतदान होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती

vishwatmaklokswamivarta