vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

नेत्रदानाच्या चळवळीत सहभाग नोंदवा- अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभिषन सारंगकर

नेत्रदानाच्या चळवळीत सहभाग नोंदवा- अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभिषन सारंगकर

सांगली, प्रतिनिधी : राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी १० जून रोजी डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन साजरा केला जातो. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यामध्ये नेत्रतपासणी शिबीरे होणे, मोतीबिंदू, काचबिंदू शिबीरे घेवून असे रुग्ण उपचाराखाली आणून त्यांच्यामधील अंधत्व दूर करणे, नेत्रदानाची, अवयवदानाची चळवळ समाजामध्ये रुजविणे व नेत्रदानाचे महत्व समाजामध्ये पटवून देणे हा आहे. मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करून नेत्रदानाच्या चळवळीत सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभिषन सारंगकर यांनी केले.यावर्षी १० ते २४ जून २०२५ अखेर सांगली जिल्ह्यामध्ये पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मिरज, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व अशासकिय स्वयंसेवी संस्था येथे डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाअंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमास निवासी वैद्यकिय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. छाया पाटील, नेत्रदान तथा अवयवदान समन्वयक अविनाश शिंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गायत्री खोत यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निवासी वैद्यकिय अधिकारी (बाहयसंपर्क) डॉ. छाया पाटील म्हणाल्या, डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन पंधरवडयामध्ये जिल्हा पातळीवर तसेच ग्रामीण पातळीवर नेत्रतपासणी शिबीरे, नेत्रदानाविषयी जनजागृतीचे कार्य केले जात आहे. सांगली जिल्हयामध्ये सन २०२४-२०२५ या कालावधीमध्ये नेत्रबुब्बुळे संकलन २२४ व तसेच १३३ बुब्बुळ प्रत्यारोपण होवून अंधांना दृष्टी मिळाली आहे. नेत्रदानाची चळवळ ही सांगली जिल्ह्यामध्ये रुजली आहे. युवक व युवतींनी नेत्रदानाबरोबरच अवयवदान जनजागृतीचे काम हाती घ्यावे. युवकांनी स्वतः या दिनी नेत्रदानाबरोबरच अवयवदानाचा संकल्प करावा. शासकिय रुग्णालयामध्ये ज्या प्रकारे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया होतात त्याचप्रकारे भविष्यामध्ये बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही शासकिय रुग्णालयामध्ये होतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित पोस्ट

किल्ले रायगड येथे एनडीआरएफकडून रोप-वे रेस्क्यू मॉक ड्रिल संपन्न

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे राज्यातील २४ जिल्हे व १०३ तालुके अवकाळीने बाधित; कृषिमंत्र्यांकडून पाहणी

श्री समर्थ सद्‌गुरु रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त-कोप्रोली येथे उत्सव कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

वनालगतच्या जमिनींवर सोलार कुंपणाची योजना विचाराधीन- वनमंत्री गणेश नाईक

बुलढाणा १९ एप्रिल रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

मिरवणुकांमध्ये प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध..