शासकीय निवासी शाळेसाठी भाडेतत्वावर इमारत उपलब्ध असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन..
सांगली, प्रतिनिधी.) : शासकीय निवासी शाळा आवश्यक सोयी-सुविधा युक्त इमारतीत भाडेतत्वावर सुरु करण्यासाठी वाळवा तालुक्यातील तुजारपूर येथील किंवा त्या परीसरामध्ये इमारत उपलब्ध असल्यास संबधित इमारत मालकांनी अधिक माहीतीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली (संपर्क क्र. ०२३३-२३७४७३९) येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील इ. ६ वी ते १० वी मधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीकरीता अनुसूचित जाती व नवबौध्दांची संख्या, साक्षरतेचे प्रमाण व शाळांची आवश्यकता विचारात घेवून नियोजित ठिकाणी सदरची शासकीय निवासी शाळा ही भाडेतत्वावर सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा युक्त इमारत भाडे तत्वार घेण्याबाबत निर्देश प्राप्त आहेत. त्याअनुषंगाने इ. ६ वी ते इ. १० वी मधील २०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची सर्व सोयी-सुविधा (निवासा करीता व वर्ग खोल्याकरीता स्वतंत्र रुम व्यवस्था, तसेच आवश्यक स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, इ.) असलेली इमारत भाडेतत्वावर घेण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.