vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्ह्यात फेरफार अदालत,२२१० प्रकरणे निकाली..

जिल्ह्यात फेरफार अदालत,२२१० प्रकरणे निकाली..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत जिल्ह्यात प्रलंबित फेरफार अदालत आज महसूल विभागाच्यावतीने प्रत्येक मंडळ अधिकारी कार्यालय स्तरावर आयोजित करण्यात आली. आज दिवसभरात जिल्ह्यात २२१० प्रकरणे निकाली काढण्यात आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या फेरफार अदालतीचा तालुकानिहाय लेखाजोखा याप्रमाणे-

पैठण तालुक्यात २०२ प्रकरणे हाताळण्यात आली. त्यात १८८ फेरफार निर्गत करण्यात आले. १० तक्रारी मंजूर करुन , १४ प्रकरणात अहवाल १ मंजूर करण्यात आला.खुलताबाद तालुक्यात १८७ प्रकरणे सादर झाली व १८७ निकाली काढण्यात आले. सिल्लोड तालुक्यात ३७० प्रकरणे निकाली काढण्यात आले.सोयगाव तालुक्यात ४२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. फुलंब्री तालुक्यात १७३ तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ७१० पैकी ६८१ निकाली काढण्यात आले.गंगापुर तालुक्यात २६२ प्रकरणे निकाली काढण्यात आले.कन्नड तालुक्यात ३३२ पैकी ३०७ प्रकरणे निकाली काढण्यात आले. असे एकूण २२१० प्रकरणे निकाली काढण्यात आले.

संबंधित पोस्ट

न्यायप्रविष्ठ प्रकरणामध्ये प्रशासनाने हस्तक्षेप करु नये – अ‍ॅड.मगरे गरिबांवरील अन्याय सहन करणार नाही – जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरेदलित, आदीवासी, भुमिहिन कास्तकरांचे अतिक्रमण नियमानूकूलित करुन सातबारा द्या-

vishwatmaklokswamivarta

जालन्यात 10 जानेवारी रोजी महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन-संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी…

30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

राज्यस्तरीय बाजार समित्यांचे सक्षमीकरण करताना शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रशासन गाँव की ओर’ मोहीम प्रभावीपणे राबवावी  — जिल्हाधिकारी किशन जावळे 

vishwatmaklokswamivarta

सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी १३५६ कोटीचा मदत-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta