vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालन्यात 10 जानेवारी रोजी महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन-संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी…

जालन्यात 10 जानेवारी रोजी महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन-संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी…

 

राज्य प्रतिनिधी

जालना : जालन्यात 10 जानेवारी रोजी महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मस्साजोग गावाचे मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जालना शहरातील गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी संघटनांच्या वतीने हा महा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आज जालन्यात मराठा आंदोलकांची बैठक पार पडली. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या आणि या प्रकरणाचा जलदगतीने तपास करा अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली. यावेळी सुनिल आर्दड,अरविंद देशमुख, देवकर्ण वाघ,विश्र्वंभर तिरुखे, संदिप ताडगे,पंकज जर्‍हाड,सुदाम मुकणे,बाळासाहेब इंगळे,बळीराम मोरे,नंदु दाभाडे,सुरेश ढवळे,गणेश कदम ,क्रूष्णा पडूळ,विष्णु कदम,सुरेश तळेकर,ऊद्धव पवार,शरद मांगधरे,गजानन काळै,मनौज ऊबाळे,मंगेश चव्हाण ,विक्रम गाढे, मंगेश देशमुख,प्रदिप गव्हाड,नामदेव धूमाळ,अनिरुद्द शेळके,योगेश पाटील,सतिश देशमुख,रवि ढगे,विष्णु घनघाव,प्रशांत वाढेकर यांच्यासह समाजबांधव उपस्िथत होते.

संबंधित पोस्ट

महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी, वाशिम येथे विशेष न्यायालये

विज्ञान व नवोन्मेषातून मानवकल्याणाचा संदेश देणारे डॉ. माशेलकर यांचे कार्य प्रेरणादायी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या ‘More from Less for More’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

आज उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा नांदेड जिल्हा दौरा …

भिंगारी (पनवेल) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न

जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाचे प्रेरणास्थान असलेले श्री. ऋषिकेशदादा कराड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ खरोळा गावामध्ये प्रचार रॅलीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा ने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथीतरित्या अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिली नोटीस, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल…