vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने कर्ज वाटप, स्वयंरोजगार मेळाव्याचे 30 एप्रिल रोजी आयोजन 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने कर्ज वाटप, स्वयंरोजगार मेळाव्याचे 30 एप्रिल रोजी आयोजन

नांदेड प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक, सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने इतर मागास बहूजन कल्याण विभागातंर्गत असलेले इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती आणि वनार्टी यांच्या संयुक्त विद्यामाने नांदेड, लातुर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील लाभार्थ्यांकरीता नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृह विष्णुनगर नांदेड या सभागृहात गुरूवार 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा. “कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी या महामंडळाच्या कर्ज वाटप व प्रशिक्षण योजनांबाबत ऑनलाईन अर्ज कसा करावा, अर्जाकरीता आवश्यक कागदपत्रे कोणती आणि अर्जातील त्रृटी कशा टाळाव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती व वनार्टी या योजनेतील पात्र ठरलेल्या/निवड झालेल्या लाभार्थ्यांना सशर्त हेतुपत्र (LOI), मंजुरी पत्राचे वाटप, प्रशस्तीपत्र, मेडलचे वाटप, ट्रॅक्टर, वाहने वगैरे वस्तुचे वितरण, मा.अतुलजी सावे, मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे महोदयांचे हस्ते करण्यात येणार आहे.

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याकरीता तांत्रिक व आर्थिक मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे, आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सौदारजी नारायण झुंझारे व इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी  जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, विमानतळ रस्ता नांदेड 431605 संपर्क क्र. 02462-220865, वेबसाईट. www.msobcfdc.org येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विकासाचे नियोजन करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा सामाजिक न्याय दिन साजरा घर घर संविधान योजनेचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

सहकार बँक कॉलनीत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा!

vishwatmaklokswamivarta

चिखली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिव राज्यभिषेक दिन साजरा

मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू..

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस•कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणीकांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक

vishwatmaklokswamivarta