vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वसुंधरा दिनानिमित्त ‘वसुंधरा रक्षक अभियान’, महा आरपीईटी अभियानाचा शुभारंभ-पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकांने ‘वसुंधरा रक्षका’ची भूमिका बजावावी- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

वसुंधरा दिनानिमित्त ‘वसुंधरा रक्षक अभियान’, महा आरपीईटी अभियानाचा शुभारंभ-पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकांने ‘वसुंधरा रक्षका’ची भूमिका बजावावी- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, प्रतिनिधी: वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि वेगाने होणारे शहरीकरण याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून पुढे यावे, असे आवाहन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ‘वसुंधरा रक्षक’ ही संकल्पना केवळ उपक्रम नसून एक जनआंदोलन बनवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित समारंभात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘वसुंधरा रक्षक अभियान २०२६’, ‘महा-आरपीईटी अभियान, राज्य वातावरणीय कृती कक्षाच्या संकेतस्थळाचे अनावरण तसेच ‘इमिशन ट्रेडिंग स्कीम प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. वसुंधरा रक्षक अभियानाच्या लोगोचेही यावेळी अनावरण करण्यात आले. या लोगोची निर्मिती स्वतः मंत्री पंकजा मुंडे यांनी तयार केली आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्यासह कोकाकोला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.

वसुंधरा रक्षक’ या संकल्पनेला मातृत्वाची जोड देत मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, वसुंधरा म्हणजे केवळ पृथ्वी नव्हे, तर आपली आई आहे. तिचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विकास, औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणाबरोबर प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे संतुलित विकासाचा मार्ग स्वीकारत पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलावी लागतील.

वसुंधरा रक्षक अभियाना’च्या माध्यमातून राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखे ‘वसुंधरा वॉरियर्स’ तयार केले जाणार आहेत. गावागावांत, वॉर्डावॉर्डात ही चळवळ पोहोचली पाहिजे. हे रक्षक प्रदूषणाविरुद्ध लढतील. प्रत्येक नागरिकाने झाडे लावणे, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकचा वापर कमी करणे अशा कृतींमधून सर्व नागरिकांनीही वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रदूषणाचा परिणाम प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्याची तीव्रता जाणवत नाही. लोकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम पाहून बदलाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याचे सांगून आजच्या पिढीला पर्यावरणातील बदल समजावून सांगण्यासाठी ‘आज-काल-उद्या’ या संकल्पनेवर आधारित माहिती आणि डेटा उपलब्ध करून दिला जाईल. आजची पिढी तंत्रज्ञानात पुढे आहे; मात्र पर्यावरणाची जाणीवही तितकीच महत्त्वाची आहे. पुढच्या पिढीला संपत्ती नव्हे, तर स्वच्छ हवा आणि पाणी देणे ही आपली जबाबदारी आहे.

‘महा-आरपीईटी’ अभियानाबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरावर भर देत ‘रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिथिंक’ या तत्वांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. अनावश्यक पॅकेजिंग कमी करणे, वस्तूंचा पुनर्वापर करणे आणि पुनर्निर्मितीला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून त्याचा उत्पादकांकडून पुन्हा वापर करण्याची संकल्पना पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. राज्यात या प्रकारचा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

औद्योगिक प्रदूषण नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उत्सर्जन व्यापार योजना इमिशन ट्रेडिंग स्कीमबाबत मंत्री मुंडे यांनी सांगितले की, कार्बन ट्रेडिंगप्रमाणेच सल्फर डायऑक्साईड उत्सर्जन नियंत्रणासाठी ही योजना महत्त्वाची आहे. उद्योगांनी उत्सर्जन कमी करण्यासाठी परस्पर सहकार्याचा मार्ग स्वीकारल्यास पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल.

वसुंधरा रक्षक व्हॉट्सॲप कम्युनिटीमुळे तरुणांपर्यंत पर्यावरणविषयक संदेश प्रभावीपणे पोहोचेल – प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम,प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितले की, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असून त्याची सुरुवात आजच्या कार्यक्रमातून होत आहे. ‘वसुंधरा रक्षक’ व्हॉट्सॲप कम्युनिटीसारख्या उपक्रमांमुळे विशेषतः तरुण पर्यावरणविषयक संदेश प्रभावीपणे पोहोचवला जाणार आहे. ‘महा-आरपीईटी’ धोरणांतर्गत उत्पादकांनी स्वतः निर्माण केलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याची जबाबदारी स्वीकारणे ही महत्त्वाची पायरी आहे. हा उपक्रम देशातच नव्हे तर जगातही आगळावेगळा असल्याचेही त्यांनी सांगितले.देशातील पहिली सल्फर डायऑक्साईड इमिशन ट्रेडिंग योजना महाराष्ट्रात सुरू होत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. सध्या राज्यातील सुमारे १०० उद्योग या प्लॅटफॉर्मवर सहभागी झाले असून भविष्यात याचा विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण संरक्षणासाठी डेटा व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा वापरही पुढील काळात करण्यात येणार आहे. प्रशासनासोबतच उत्पादक आणि नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज यांनी सांगितले की, जागतिक वसुंधरा दिन हा केवळ निसर्गाशी संबंधित विषय नसून तो सार्वजनिक आरोग्य, जीवनमान, शाश्वत विकास आणि पुढील पिढीच्या भवितव्याशी थेट जोडलेला आहे. आजचा दिवस आपल्याला थांबून विचार करण्याची आणि अधिक हरित व जबाबदार भविष्यासाठी आपली बांधिलकी दृढ करण्याची संधी देतो. महा आरपीटी अभियान हे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. ‘वसुंधरा रक्षक’ उपक्रमाद्वारे विद्यार्थी, तरुण, महिला आणि नागरिकांना शाश्वत जीवनशैलीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अवर पॉवर, अवर प्लॅनेट’ या यंदाच्या संकल्पनेचा उल्लेख करत त्यांनी पर्यावरण संरक्षणाची खरी ताकद केवळ धोरणांत नसून नागरिक, संस्था आणि समाजाच्या दैनंदिन निर्णयांमध्ये दडलेली असल्याचे स्पष्ट केले.0000

संबंधित पोस्ट

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा;एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना- अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार -पालकमंत्री जयकुमार रावल

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यांत ‘डिजिटल शेतीशाळा’ 1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन· सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

नमुंमपा शाळेतील माजी विद्यार्थिनी पश्चिम विभागाची कर्णधार फुटबॉलपटू राबिया शेख यांचा आयुक्तांनी केला विशेष सत्कार…

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमेन्स होस्टेल वओल्ड एज होम उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा- गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून म्हाडाच्या कामकाजाचा आढावा…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सार्वजनिक ठिकाणीसीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार– गृहराज्यमंत्री योगेश कदम