vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

मुंबई, प्रतिनिधी: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

अजित दादांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. दादांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत.

अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य आपण जपू या असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत, अशी विनंती उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली आहे.

 

….

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनामहाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला होणार सुरुवात ..

vishwatmaklokswamivarta

मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र शासनाचे चार, नऊ व पंधरा वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न ऑलिम्पिक स्पर्धेतील दर्जाचा स्विमींग पुल तयार करण्यात यावा  – पालकमंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात ‘पद्मश्री’प्रमाणे ४ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ व २० जणांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार *हिंदु राष्ट्ररत्न-आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड, डॉ. सच्चिदानंद शेवडे;- सनातन धर्मश्री : आमदार टी. राजा सिंह, अधिवक्ता विष्णु जैन, प्रमोद मुतालिक..

महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश!**बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ?* – रमेश शिंदे