vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

हाँगकाँगमध्ये एका निवासी इमारतीला लागली भीषण आग; 44 मृत्युमुखी, 45 गंभीर जखमी, 4,600 लोकांवर संकट

 हाँगकाँगमध्ये एका निवासी इमारतीला लागली भीषण आग; 44 मृत्युमुखी, 45 गंभीर जखमी, 4,600 लोकांवर संकट

 

विदेश प्रतिनिधी-हाँगकाँगमध्ये एका निवासी इमारतीला लागली भीषण आग; 44 मृत्युमुखी, 45 गंभीर जखमी, 4,600 लोकांवर संकट आलेले आहे सकाळी लागलेल्या या आगीवर आता नियंत्रण मिळवल्याची माहिती ही रायटर्स एजन्सी द्वारे देण्यात आलेली आहे

हाँगकाँगच्या ताई पो परिसरातील एका निवासी भागाला भीषण आग लागली आहे.या आगीत किमान 44 जणांचा मृत्यू झाला असून 45 जणांची प्रकृती गंभीर आहे. आणखी 279 जण बेपत्ता आहेत.

घटनास्थळावरून आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे लोट, आगीच्या ज्वाळा, आग विझवण्यासाठी प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे जवान आणि गोंधळात पळणारे लोक स्पष्ट दिसत आहेत.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार ही आग हाँगकाँगमधील ‘वांग फुक कोर्ट’ नावाच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये लागली आहे. या कॉम्प्लेक्समध्ये आठ ब्लॉक्स असून एकूण दोन हजार फ्लॅट्स आहेत

हाँगकाँग सरकारच्या माहितीनुसार, वांग फुक कोर्टमध्ये ही आग दुपारी सुमारे 2 वाजून 51 मिनिटांनी भडकली आणि त्यानंतर अग्निशमन विभागाला कळवण्यात आले.

या प्रकरणी मनुष्यवधाच्या संशयावरून तीन जणांना अटक करण्यात आली आहे . त्यापैकी दोन जण बांधकाम कंपनीचे संचालक असून एक जण अभियांत्रिकी सल्लागार आहे.

आगीचे नक्की कारण अद्याप समजलेले नाही. मात्र पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी खिडक्यांना अडथळा आणणारे पॉलीस्टायरीन बोर्ड आढळले आहेत. इमारतीत नूतनीकरणाचे काम सुरू होते आणि या बोर्डांमुळे आग वेगाने पसरली असावी. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आग बांबूच्या परांचीमुळे शेजारच्या इमारतींमध्येही झपाट्याने पसरली

आज सकाळीही काही टॉवर ब्लॉक्समधून धुराचे लोट निघत आहेत. मात्र आठपैकी चार इमारतींमध्ये आग नियंत्रणात आली आहे. सदर बातमी बीबीसी न्यूज मध्ये सुद्धा आलेली आहे सौजन्य बीबीसी

संबंधित पोस्ट

आज उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सांगली जिल्हा दौरा..

vishwatmaklokswamivarta

समाजातील सौहार्द वाढविण्यासाठी उपक्रम राबवा- गृहराज्यमंत्री योगेश कदम

vishwatmaklokswamivarta

सटाणा–मंगरूळ रस्त्याच्या कामातील समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवा – मंत्री दादाजी भुसे

जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

मेळघाटातील कुपोषण नियंत्रणासाठी उपाययोजना करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

प्रति मिनिट 1.5 लाखांहून अधिक तिकिटे देण्याची म्हणजेच,मिनिटाला 32,000 तिकीटे देणाऱ्या सध्याच्या प्रणालीच्या पाच पट क्षमता असलेली नवी प्रवासी आरक्षण प्रणाली या वर्षअखेरीपर्यंत तयार होणार प्रवाशांची सोय आणि स्मार्ट तिकीट प्रणालीवर भर देत भारतीय रेल्वे आपली प्रवासी आरक्षण प्रणाली बहुभाषिक बनवणार