vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

प्रति मिनिट 1.5 लाखांहून अधिक तिकिटे देण्याची म्हणजेच,मिनिटाला 32,000 तिकीटे देणाऱ्या सध्याच्या प्रणालीच्या पाच पट क्षमता असलेली नवी प्रवासी आरक्षण प्रणाली या वर्षअखेरीपर्यंत तयार होणार प्रवाशांची सोय आणि स्मार्ट तिकीट प्रणालीवर भर देत भारतीय रेल्वे आपली प्रवासी आरक्षण प्रणाली बहुभाषिक बनवणार

प्रति मिनिट 1.5 लाखांहून अधिक तिकिटे देण्याची म्हणजेच,मिनिटाला 32,000 तिकीटे देणाऱ्या सध्याच्या प्रणालीच्या पाच पट क्षमता असलेली नवी प्रवासी आरक्षण प्रणाली या वर्षअखेरीपर्यंत तयार होणारप्रवाशांची सोय आणि स्मार्ट तिकीट प्रणालीवर भर देत भारतीय रेल्वे आपली प्रवासी आरक्षण प्रणाली बहुभाषिक बनवणार

 

राज्य प्रतिनिधी-भारतीय रेल्वे प्रवाशांचा संपूर्ण प्रवासाचा अनुभव प्रवासी-केंद्रित बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. रेल्वे प्रवासाचा अनुभव तिकीट आरक्षणापासून सुरू होतो. त्यामुळे रेल्वे तिकीट बुकिंग अधिक सोपे करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच या सुधारणांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तिकीट प्रणाली स्मार्ट, पारदर्शक, सुलभ आणि कार्यक्षम असावी, यावर त्यांनी भर दिला. नियोजन प्रवाशांच्या सोयीवर केंद्रित असावे. ही प्रणाली आपल्या प्रवाशांना सुरळीत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणारी असावी, असेही त्यांनी नमूद केले.सुधारित आगाऊ तक्तानिर्मितीमुळे प्रवासाच्या नियोजनामध्ये निश्चिती

तक्तानिर्मिती: सध्या आरक्षणाचा तक्ता रेल्वेगाडी रवाना होण्याच्या चार तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते.

ही अनिश्चितता दूर करण्यासाठी, रेल्वे बोर्डाने प्रवासाच्या आठ तास आधी आरक्षण तक्ता तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. रेल्वेमंत्र्यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली आणि बोर्डाला हे बदल टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.

आधुनिक प्रवासी आरक्षण प्रणाली(PRS) डिसेंबर 2025 पर्यंत येणाररेल्वेमंत्र्यांनी प्रवासी आरक्षण प्रणालीच्या अद्ययावतीकरणाचा आढावा घेतला. हा प्रकल्प गेल्या काही महिन्यांपासून क्रिस (CRIS) द्वारे कार्यान्वित केला जात आहे.नवीन सुधारित पीआरएस रचना अतिशय गतिमान, लवचिक आणि वाढीव क्षमतेचीअसून, सध्याच्या तुलनेत दहा पट अधिक भार हाताळण्यास सक्षम आहे. यामुळे तिकीट बुकिंगची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल.नवीन पीआरएस प्रति मिनिट 1.5 लाखांहून अधिक तिकिटे बुक करण्याची सुविधा देईल. सध्याच्या पीआरएसमध्ये प्रति मिनिट 32,000 तिकिटांची क्षमता आहे, त्या तुलनेत ही क्षमता सुमारे पाच पट वाढणार आहे.तिकीट चौकशीची क्षमता दहा पटीने वाढणार आहे, म्हणजेच प्रति मिनिट 4 लाखांवरून 40 लाखांहून अधिक चौकशी शक्य होतील

नवीन पीआरएसमध्ये बहुभाषिक आणि वापरकर्ता-स्नेही बुकिंग तसेच चौकशी इंटरफेस देखील आहे.नव्या पीआरएसमध्ये वापरकर्ते त्यांच्या आसनाची निवड सादर करू शकतील आणि शुल्क कॅलेंडर (fare calendar) पाहू शकतील. यात दिव्यांगजन, विद्यार्थी, रुग्ण इत्यादींसाठी एकात्मिक सुविधा देखील आहेत.

नव्या पीआरएसमध्ये वापरकर्ते त्यांच्या आसनाची निवड सादर करू शकतील आणि शुल्क कॅलेंडर (fare calendar) पाहू शकतील. यात दिव्यांगजन, विद्यार्थी, रुग्ण इत्यादींसाठी एकात्मिक सुविधा देखील आहेत.

तत्काल बुकिंगसाठी सुव्यवस्थित प्रमाणीकरणभारतीय रेल्वे 1 जुलै 2025 पासून आयआरसीटीसी (IRCTC) वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर तत्काल तिकिटे बुक करण्याची परवानगी केवळ प्रमाणीकृत वापरकर्त्यांना देईल.जुलै 2025 च्या अखेरीस, ‘तत्काल’ बुकिंगसाठी ओटीपी-आधारित प्रमाणीकरण केले जाईल.रेल्वेमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना ‘तत्काल’ बुकिंगसाठी प्रमाणीकरण यंत्रणा व्यापक करण्याचे निर्देश दिले. वापरकर्त्याच्या डिजीलॉकर खात्यात उपलब्ध असलेल्या आधार किंवा इतर कोणत्याही पडताळण्यायोग्य सरकारी ओळख पत्राचा वापर करून प्रमाणीकरण केले पाहिजे.या उपाययोजनांमधून भारतीय रेल्वे आपल्या प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि ती अधिकाधिक नागरिक-स्नेही बनवण्यासाठी करत असलेल्या अथक प्रयत्नांचे प्रतिबिंब दिसत आहे.**

संबंधित पोस्ट

महासंस्कृती, महानाट्य महोत्सव; दि.२२ ते २५ सांस्कृतिक कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ: पीडित, आरोपीचीही ओळख गुप्त राखली पाहिजे; हायकोर्टाच्या सूचना या मार्गदर्शक सूचनांमुळे या कायद्याच्या प्रकरणांचे प्रसारमाध्यमांतील वृत्तांकन पूर्णपणे प्रतिबंधित होणार

vishwatmaklokswamivarta

कालकाई इंडिया लिमिटेड च्या संचालकांना अटक करा गुंतवणूकदारांची मागणी

vishwatmaklokswamivarta

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती राज्यभर उत्साह; मुख्यमंत्र्यासह दिग्गजांचे अभिवादन

महाराष्ट्रा मुंबईसह कोकणात पावसाच्या हलक्या सरी; राज्याच्या ‘या’ भागाला यलो अलर्ट…

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना फळपिक विमा मिळण्यासासाठी अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta