vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्यातील दि. 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर,हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ..

महाराष्ट्र राज्यातील दि. 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर,हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ..

          ठाणे, प्रतिनिधी :- परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील दि.1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत. त्याकरिता परिवहन विभागाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यालयासाठी M/s REAL MAZON INDIA LTD., एजन्सीची नियुक्ती केली असून HSRP बुकिंग पोर्टल लिंक/URL https://hsrpmhzone२.in आहे व दि.1 जानेवारी 2025 पासून हे काम सुरु झाले आहे.

परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या परिपत्रकान्वये जुन्या वाहनांना HSRP बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, अनेक जुन्या वाहनांवर HSRP बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने परिवहन आयुक्त, मुंबई यांच्याकडून दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यासाठी दि.15 ऑगस्ट 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर HSRP नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाव्दारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच दि.15 ऑगस्ट 2025 पर्यंत HSRP बसविण्यासाठी पुढील अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

नवी मुंबई विमानतळ मुंबईशी जोडण्यासाठी बोगदा प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीएला निर्देश

सामाजिक न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये स्मारकात पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा सामंजस्य करार*

विकसित महाराष्ट्र 2047 – व्हिजन डॉक्युमेंट सर्वेक्षणात सहभागासाठी उरले फक्त सहा दिवस..

बॉलीवूडचे हसमुख विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन..

vishwatmaklokswamivarta

8 मार्च रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम