vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडूनशहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा..

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडूनशहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज शहर पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. 26 एमएलडी पाणी देण्याबाबतचे नियोजन विभागाने पूर्ण केले आहे. 1 ऑगस्टपासून पाणी पुरवठा करण्याबाबतची चाचणी सुरू करण्यात येणार आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर तातडीने नियमित पाणी पुरवठा करणार असल्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, नगर पालिका प्रशासन सहआयुक्त देवीदास टेकाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील यांच्यासह यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी जायकवाडी धरणातील उद्भव विहिर (जॅकवेल) पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र फारोळा, ॲप्रोच ब्रिज अशुद्ध जलवाहिनी, शुद्ध जलवाहिनी, पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी जो कालावधी निश्चित करण्यात आला आहे त्या कालमर्यादेत काम पूर्ण करा, कोणत्याही परिस्थितीत आलेल्या अडचणींवर तात्काळ मार्ग काढून कामात विलंब होणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी आज संबंधित यंत्रणेला दिले.यावेळी संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*****

संबंधित पोस्ट

७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम – मंत्री प्रताप सरनाईक स्वच्छ, हरित आणि सक्षम एसटी घडवण्याचा संकल्प; एसटीचा ७८ वा वर्धापन दिन

दुबईत युद्धजन्य तणाव; हजारो भारतीय अडचणीत – केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी : खासदार डॉ. कल्याण काळे

संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लखनौ छावणीतील स्मृतिका युद्ध स्मारक येथे अत्याधुनिक लेझर, लाईट आणि साऊंड शोचे उद्घाटन

महाराष्ट्र शासनाचे ४ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

जालन्यात शिवसेना महिला आघाडीचा `माझं कुकूं माझा देश’ आंदोलन

vishwatmaklokswamivarta