vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

एन्व्हायरोटेक एशिया 2026′ परिषदेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे जल व्यवस्थापनावर प्रभावी सादरीकरण…

‘एन्व्हायरोटेक एशिया 2026’ परिषदेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे जल व्यवस्थापनावर प्रभावी सादरीकरण…

नवी मुंबई प्रतिनिधी –  पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराला चालना देणारी एन्व्हायरोटेक परिषद 2026 नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये संपन्न झाली. यामध्ये केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी, विविध महानगरपालिका व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, निरी तसेच औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे प्रतिनिधी, संशोधक, सल्लागार आणि धोरणकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  या परिषदेमध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे व अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवी मुंबई महानगरपालिकेचे उप अभियंता श्री. स्वप्नील देसाई यांनी ‘प्रक्रियाकृत सांडपाणी भविष्यातील जलस्त्रोत (Wastewater as a Future Water Source: Advancing Treatment Technologies & Tackling Emerging Contaminants)’ या विषयावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.

 भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल व माहितीपूर्ण सादरीकरणामध्ये त्यांनी भविष्यातील वाढती पाणीटंचाई, जलस्रोतांवरील वाढता ताण आणि शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी हे पर्यायी व शाश्वत जलस्रोत म्हणून कसे विकसित करता येईल याबाबत सविस्तर मांडणी केली. आधुनिक सांडपाणी उपचार तंत्रज्ञान, तृतीय व चतुर्थ स्तर उपचार (Tertiary & Advanced Treatment), उदयास येणारे प्रदूषक (Emerging Contaminants) आणि त्यांचे संभाव्य धोके तसेच त्यावरील नियंत्रण व उपाय यावर त्यांनी विशेष भाष्य केले. यासोबतच महानगरपालिकेच्या स्तरावर करता येणाऱ्या व्यावहारिक उपाययोजना व धोरणात्मक दृष्टिकोन यावरही त्यांनी प्रकाश टा कला

 सदर परिषदेचे उद्घाटन उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री. पी. अनबलगन यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी पर्यावरणपूरक औद्योगिक विकास, स्वच्छ तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शासन–उद्योग–स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.

     अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या जल व्यवस्थापनाविषयी सादरीकरणाचा बहुमान मिळणे ही गौरवशाली बाब आहे.

00000

संबंधित पोस्ट

पं. चंद्रकांत लिमये यांना आदरांजली अर्पण करणारा कार्यक्रम १७ जुलै रोजी पु.ल कट्ट्यावर

कर्करोग निदान मोबाइल व्हॅनद्वारे ठाणे जिल्ह्यात तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा प्रारंभ  

vishwatmaklokswamivarta

आखाती देशातील युद्धसदृश परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रभावित झालेली विमान सेवा व विमान उड्डाणे सुरू

vishwatmaklokswamivarta

पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधीची तरतूद करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम;शाळास्तरावर दि.१५ पासून जनजागृतीसाठी विविध उपक्रम..

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन -उपमुख्यमंत्री अजित पवार