vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक मधमाशी दिनानिमित्त बुलढाण्याच्या राजेंद्रदास बैरागी यांना राज्यस्तरीय “मधुमीत्र” पुरस्कार

जागतिक मधमाशी दिनानिमित्त बुलढाण्याच्या राजेंद्रदास बैरागी यांना राज्यस्तरीय “मधुमीत्र” पुरस्कार

बुलढाणा, प्रतिनिधी -गतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2026 चा राज्यस्तरीय “मधुमीत्र” पुरस्कार धाड (ता. जि. बुलढाणा) येथील मध उत्पादक व मधुपालक राजेंद्रदास प्रकाश बैरागी यांना प्रदान करण्यात आला.
मध उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, दीर्घ अनुभव, मध उत्पादन, मधमाशांच्या वसाहतींचे संवर्धन, प्रशिक्षण तसेच संशोधनात्मक योगदान या निकषांच्या आधारे निवड समितीमार्फत त्यांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार 20 मे 2026 रोजी संत एकनाथ रंगमंदिर, क्रांती चौक, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विशेष पुरस्कार वितरण समारंभात प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते बैरागी यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य सभापती (राज्यमंत्री दर्जा) रविंद्रजी साठे, लक्ष्मण अधिकारी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) राजकुमार डांगर, उप मुख्य अधिकारी (उद्योग) नित्यानंद पाटील, मध संचालक महाबळेश्वरचे रघुनाथ नारायनकर तसेच जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बुलढाणा संजय इंगळे तसेच सर्व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, कर्मचारी, मधनिरीक्षक, मधुपालक व मध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेंद्रदास बैरागी यांच्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून जिल्ह्यातील मध उद्योग क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली आहे.
000000

संबंधित पोस्ट

धार्मिक स्थळांवर भाविकांना मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले आभार

ज्ञान पोस्ट’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ मार्च रोजी वितरण

केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांचे उमेदवार स्नेहा सिद्धार्थ कसारे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन धुवाधार प्रचार सुरू विरोधकांची हवा उडाली…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टेट) परीक्षा: 23 नोव्हेंबरला

vishwatmaklokswamivarta

चौथे विश्व मराठी संमेलन मराठीचा शुद्ध, सक्षम आणि प्रभावी वापरासाठी माध्यमांचा नेहमीच पुढाकार -मराठी परिसंवादातील सूर