vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा..

, राज्य प्रतिनिधी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दहशतवाद विरोधी दिनानिमित्त लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा दिली.

अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतिदिन दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो.राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे यांसह लोकभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यावेळी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

नव्या मुंबईत विविध सोसायट्या व संस्थांमध्ये जाऊन घनकचरा व्यवस्थापन नवीन नियमावलीचे माहिती प्रसारण

माणगांव शहरातील नागरी समस्यांचे मान्सूनपूर्व निराकरण करा – मंत्री आदिती तटकरे

जालन्यात शिवसेना महिला आघाडीचा `माझं कुकूं माझा देश’ आंदोलन

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण -सुनेत्राताई अजित पवार उपमुख्यमंत्री

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांहस्ते शुभारंभ.राज्यात प्रथमच या संकल्पनेची सुरुवात घरबसल्या लोकांना योजनांचा लाभ मिळणार