vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-मतदान कर्मचाऱ्यांना थेट केंद्रावरच मिळणार ईव्हीएम व साहित्य,३ लाख ३३ हजार ५४५ मतदार बजावणार हक्क ; सर्व मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ची नजर, कडेकोट बंदोबस्त

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-मतदान कर्मचाऱ्यांना थेट केंद्रावरच मिळणार ईव्हीएम व साहित्य,३ लाख ३३ हजार ५४५ मतदार बजावणार हक्क ; सर्व मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ची नजर, कडेकोट बंदोबस्त

अहिल्यानगर, प्रतिनिधी — राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून २३ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना सुरक्षित व निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी सर्व ३७४ मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीतील एक अत्यंत महत्त्वाचा व नाविन्यपूर्ण बदल म्हणजे, मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व साहित्यासाठी मुख्यालयात एकत्र येण्याची गरज नसून, त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवरच थेट साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, उप जिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांच्या देखरेखीखाली या निवडणूक प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

वेळ व श्रमाची बचत व्हावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी थेट त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवरच पोहोचायचे आहे. ईव्हीएम मशीन आणि इतर सर्व आवश्यक मतदान साहित्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत (Sector Officers) थेट या मतदान केंद्रांवरच पोहोच केले जाणार आहे. तसेच, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य पुन्हा केंद्रावरूनच क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे जमा करावयाचे आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत ३६ पोलीस अधिकारी, ७०८ पोलीस कर्मचारी आणि ३९१ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ची एक तुकडी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) एक प्लाटून सुरक्षेसाठी पाचारण करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी सर्व ३७४ मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ द्वारे थेट लक्ष ठेवले जाणार आहे.

मतदार ओळखपत्र नसलेल्या नागरिकांनाही आपला हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाने १२ पर्यायी कागदपत्रांना मान्यता दिली आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे छायाचित्रयुक्त पासबुक आदींचा समावेश असून यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे.

मतदारसंघातील १ लाख ७२ हजार २३१ पुरुष, तसे १ लाख ६१ हजार ३१२ स्त्री आणि ०२ इतर मतदारांनी २३ एप्रिल रोजी लोकशाहीच्या या उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 प्रत्येक नागरिकाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती टाळावी आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच निवडणुकीत सर्व पात्र मतदारांनी उर्त्स्फूतपणे सहभागी हाेउन मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा,ग्राहकांनी वस्तु, सेवेची खरेदी करतांना जागरुकता बाळगावी- अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर• 15 महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर

vishwatmaklokswamivarta

जनकल्याण यात्रेचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*    *मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे होणार सातारा जिल्ह्यात विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा जागर*

महाज्योती’च्या स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसादओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीची संधी,विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली.

सार्वत्रिक निवडणुका व पोटनिवडणुका 2026: ईसीआयनेट प्लॅटफॉर्मद्वारे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घ्या

पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित ईको ग्लॅम्पिंग महोत्सवाचे उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta