vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी व्यापक धोरण राबविणार – मंत्री आदिती तटकरे एकल महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी व्यापक धोरण राबविणार – मंत्री आदिती तटकरे-एकल महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील अंदाजे ५० ते ५५ लाख एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी स्वतंत्र व व्यापक धोरण राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यांच्या हितसंवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

 

महिला व बाल विकास विभाग, मुंबई शहर यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एकल महिला दिन’ तसेच प्रस्तावित ‘एकल महिला धोरण’ यानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

 

यावेळी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते तसेच जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी एकल महिला धोरणाचे महत्त्व, कार्यशाळेची उद्दिष्टे आणि धोरण निर्मितीची प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेत विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विभागाच्या लाभार्थी महिला तसेच अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिला धोरण आणि एकल महिला धोरण हे काळानुरूप बदलणारे व लोकाभिमुख असेल. महिलांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना, अभिप्राय आणि गरजांच्या आधारे त्यामध्ये आवश्यक बदल करण्यात येतील. एकल महिलांसाठी सुरक्षित निवारा, कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्रे, घर व जागेसंदर्भातील सवलती तसेच घरेलू हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांचा जलद निपटारा यासाठी विविध शासकीय यंत्रणांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’ ऐवजी महाराष्ट्र शासनाने ‘एकल महिला दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, राज्यातील एकल महिलांच्या समस्या, गरजा आणि हक्क यांवर केंद्रित स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग सक्रियपणे कार्यरत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रलंबित प्रतिवेदन/ई-चालन संदर्भात लोकअदालत 

स्त्री ही नैसर्गिक शक्तिमान असती तिच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास तिला अधिक लढण्याची बळ मिळते –संजीवनी ताडेगावकरआधार ग्रुपने केला विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

जालना महापालिके मार्फत 50000 वृक्ष लागवड कार्यक्रमाचे जागतिक पर्यावरण दिनी मा.आमदार अर्जुन खोतकर यांचे हस्ते वृक्ष रोपण करून सुरुवात… 

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतील प्रकल्प प्राधान्याने कार्यान्वित करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी 31 जुलैपर्यंत करावी

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*