vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना महापालिके मार्फत 50000 वृक्ष लागवड कार्यक्रमाचे जागतिक पर्यावरण दिनी मा.आमदार अर्जुन खोतकर यांचे हस्ते वृक्ष रोपण करून सुरुवात… 

जालना महापालिके मार्फत 50000 वृक्ष लागवड कार्यक्रमाचे जागतिक पर्यावरण दिनी मा.आमदार अर्जुन खोतकर यांचे हस्ते वृक्ष रोपण करून सुरुवात…

 

राज्य प्रतिनिधी -मा. प्रधान सचिव नगर विकास यांनी दिनांक 2 जून 2025 रोजी च्या बैठकीत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक 5 जून 2025 पासून सन 2025 करिता राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. वृक्ष लागवडीसाठी जालना शहर महानगरपालिकेला 50000 झाडे हे उद्दिष्ट देण्यात आले आहे.तसेच दिनांक 5 जून रोजी सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थित वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करून अभियानाची सुरुवात करावी असे निर्देश दिले.त्या अनुषंगाने 05 जून 2025 जागतिक पर्यावरण दिन तसेच एक पेड मा के नाम मोहीम अंतर्गत जालना शहर महानगरपालिकेमार्फत नंदनवन कॉलनी येथे जालना विधानसभेचे सन्माननीय आमदार श्री अर्जुन खोतकर यांचे शुभ हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती प्रियंका राजपूत सहाय्यक आयुक्त श्रीमती अपर्णा जाधव सहाय्यक आयुक्त श्री केशव कानपुडे तसेच कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर, विजयसिंह सांगळे, डाके, श्री आनंद मोहिते श्री सचिन पितळे इतर अधिकारी व कर्मचारी यांची लक्षणीय उपस्थित होती. कॉलनीतील माजी नगरसेवक राहुल हिवराळे तसेच कॉलनीतील रहिवासी व बहुसंख्या महिला उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमात ऑक्सफर्ड स्कूल जालना शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम द्वारे सन्माननीय आमदारांचे स्वागत केले व पथनाट्यद्वारे पर्यावरण संरक्षण संवर्धन करण्याचा संदेश दिला.याप्रसंगी सदर ठिकाणी 100 विविध प्रकारचे रोपे लागवड करण्यात आली.

संबंधित पोस्ट

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज करणार प्रबोधन

vishwatmaklokswamivarta

मी प्रथम देशाचा हे कायम लक्षात ठेवून देशसेवा करा –डॉ. जयपाल पाटील उंबरखिंड,

पाण्याची आवर्तने देताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

मोदी सरकारचा 2025 अर्थसंकल्प शेतकरी, महीला, युवा, कामगार, उद्योजकांना उन्नती देणारे व सर्वसामान्य मध्यवर्गीयांना दिलासा देणारे – रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta

बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी- प्रतापराव जाधव• जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन• बुलडाण्यात विक्री, प्रदर्शन 9 मार्चपर्यंत

इंडिया स्किल्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; ४ सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदक केली प्राप्त कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले विजेत्यांचे कौतुक; इंडिया स्किल्सची आगामी स्पर्धा होणार मुंबईत