vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी- प्रतापराव जाधव• जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन• बुलडाण्यात विक्री, प्रदर्शन 9 मार्चपर्यंत

बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी- प्रतापराव जाधव• जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन• बुलडाण्यात विक्री, प्रदर्शन 9 मार्चपर्यंत

 

बुलढाणा, प्रतिनिधी) : बचत गटांद्वारे उत्पादित मालांना चांगला भाव मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. बचत गटांच्या वस्तू केवळ महोत्सवापुरत्या मर्यादित न राहता त्या बाराही महिने ग्राहकांसाठी उपलब्ध राहिल्या पाहिजेत. यासाठी आठवडी बाजार, विविध महोत्सव, शिबिरे तसेच बचत गटांसाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र सुरू करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

जिल्हा ग्राम विकास यंत्रणा,कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विक्री प्रदर्शन, मिनी सरस व पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, शिवशंकर भारसाकळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पांडूरंग कोल्हे, ‘उमेद’चे जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, महिलांमध्ये कौशल्य आणि सुप्त गुण मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र त्यांना योग्य संधी मिळत नाही. या महोत्सवाच्या निमित्ताने महिलांना आपली कला आणि उत्पादने सादर करण्याची संधी उपलब्ध झाली असून त्या संधीचे सोनं करावे. बचत गटांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यावर भर देणे गरजेचे असून बँकांनीही महिलांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सीएलएफ (CLF) निधी पूर्वी ६० हजार रुपये इतका मर्यादित होता; मात्र केंद्र सरकारने त्यास वाढ देत तो आता दीड लाख रुपयांपर्यंत मंजूर केला आहे. या वाढीव निधीचा बचत गटांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांनी कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीत सक्रिय सहभाग घ्यावा. त्यामुळे त्यांना कुटुंबात आणि समाजात मान-सन्मान मिळेल. प्रत्येक महिलांनी पुढे येऊन काम करण्याचे धाडस दाखवावे. ‘लखपती दीदी’ इतक्यावर न थांबता ‘करोडपती दीदी’ होण्याचा संकल्प महिलांनी करावा.

संबंधित पोस्ट

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात माय मराठीचा जागर!मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते,मातृभाषेच्या सन्मानासाठी सर्वजण पुढाकार घेऊया- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे..

रायगड जिल्ह्यात २० हजार ४८९ घरकुलांचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन  जागतिक महिलादिन घरकुलयोजना…

रासायनिक दुर्घटनेचे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक; ३०० जणांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील एकूण ९९ हजार ६४८ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धआधार प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन, लाभार्थी संख्येत आणखी वाढ होणार

राहुल गांधी संविधानाचा अवमान करीत आहेत ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

समस्त वारकरी संप्रदाय, संस्थान, संस्था आणि संघटना**वारकऱ्यांच्या मागण्यांसाठी पंढरपूर येथे ‘वारकरी महाअधिवेशन’ संपन्न!*  *वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडण्याचे कटकारस्थान रचणाऱ्यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार!*