vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन* 

*धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

सातारा प्रतिनिधी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजाच्या विदयार्थ्यांकरीता शहरातील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत सातारा जिल्हयामध्ये गुरुकृपा कॉन्व्हेंट स्कूल, पाचगणी, ता. महाबळेश्वर, पाचगणी इंटरनॅशनल स्कूल, पांचगणी, ता. महाबळेश्वर व ब्लू डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूल, लोणंद, ता. खंडाळा या तीन शाळांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणून शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. तरी या शाळांमध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक डॉ. कांचन जगताप यांनी केले आहे.

सन २०२५-२६ वर्षाकरीता सदर शाळांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून प्रवेशाकरीता अर्जासोबत विदयार्थ्यांचे जन्म प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड व पालकांचे रक्कम रु. १ लक्षच्या मर्यादेतील उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश प्राप्त झालेल्या विदयार्थ्यांना निवास, भोजन व्यवस्था, शैक्षणिक साहित्य इ. सर्व सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत. तसेच विदयार्थ्यांना सदर शाळांमधील अन्य प्रवर्गाच्या विदयार्थ्यांसमवेत एकत्रितपणे शिक्षण दिले जाणार आहे. तसेच शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इ. १ली ते ८वी च्या विदयार्थ्यांकरीता प्रवेश मंजूर करण्यात येईल व पुढे इ. १२ वी पर्यंत मोफत शिक्षणाचा लाभ अनुज्ञेय राहिल.

तरी सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी धनगर प्रवर्गातील इ. १ ली ते ८ वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विदयार्थ्याच्या प्रवेशाकरीता त्यांच्या पालकांनी १५ जून पर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.

0000

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरातील रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याची तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविरोधातील मोहीम बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या कारवाई सुरूच

भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

शिर्डी येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’चे उद्घाटन सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट – हरिभाऊ बागडे

vishwatmaklokswamivarta

यूपीएससी मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता मॉक इंटरव्हिव्यूचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्त-महिला व बाल विकास विभागाला बळ !‘महिला व बाल विकास भवन’( अहिल्याभवन ) उभारणीला मान्यता !एकाच छताखाली १३ विभागांच्या कार्यालयांची सोय

यशदा पुणे येथील राज्यस्तरीय कार्यशाळेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉटर प्लस मानांकनाविषयी सादरीकरणाचा मान*