vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डॉ आंबेडकर चळवळीतील गुणाबाई गाडेकर यांचा 50 व स्मृतिदिन धारावी संपन्न

 डॉ आंबेडकर चळवळीतील गुणाबाई गाडेकर यांचा 50 व स्मृतिदिन धारावी संपन्न

[ मुंबई प्रतिनिधी- वाचनातून माहिती व प्रेरणा मिळते असाच काहीसा प्रकार डॉ आंबेडकर चळवळीत चर्मकार समाजातील स्वर्गीय गुणाबाई रामचंद्र गाडेकर व सावित्री बोराडे यांच्या इतिहासातील नोंदी स्मृतिगंध पुस्तके संपादिका सुनीता सावरकर यांनी नमूद केले आहे या पुस्तकाचा धागा पकडून धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत आणि वुमन वेल्फेअर फोरम मुंबई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून डॉ आंबेडकर चळवळीतील गुणाबाई रामचंद्र गाडेकर यांच्या 50 व्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 16 मे 2025 रोजी सकाळी साडेदहा वाजता स्थळ जय भवानी क्रीडा मंडळ नवी चाळ धारावी येथील पटांगणात चर्मकार समूहातील लोकांकरिता एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे साहित्यिक व कवीवर्य श्री विलास देवळेकर साहेब ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप गाडेकर श्री गिरीराज शेरखाने व श्रीमती अलका साबळे यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री देवळेकर यांनी स्वर्गीय गुणाबाई रामचंद्र गाडेकर समाजसेविका यांचा जीवन परिचय व कार्य यावर आधारित कविता करून त्याचे वाचन करून उपयुक्त माहिती जनसमुदायाला दिली त्यानंतर श्री गिरीराज शेरखाने यांनी डॉ आंबेडकर चळवळीतील श्रीमती गाडेकर व बोराडे यांचा स्मृतिगंध पुस्तकातील इतिहास वाचून श्री गाडेकर यांनी चर्मकार समाजासमोर एक वेगळ्या पायंडा निर्माण केला याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे असे मत व्यक्त केले

 उपस्थितांपैकी श्री गोविंद भोईटे छाया ढवळे शंकर गोपीरळे यांनीही आपली मनोगत व्यक्त केली सदर कार्यक्रमात श्री देवळीकर यांनी वक्त्यांना संत रोहिदास महाराज यांची पुस्तके भेट म्हणून दिली तशी गाडेकर यांनी चर्मकार समाजातील दोन्ही घटकांना एकत्र घेऊन डॉ आंबेडकर यांचे समतेचे विचार समाजात रुजवावे असे आव्हान केले यावेळी श्रीमती सविता शेरखाने श्री संदीप कुमार श्री शंकर पोटे श्री शंकर गोपी रे व ज्येष्ठ नागरिक श्री रामचंद्र सोनटक्के यांचेही सहकार्य लाभले कार्यक्रमाचे शेवटी स्वर्गीय गुणाबाई रामचंद्र गाडेकर व सावित्री बोराडे यांना सामुदायिक वंदन करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रम समारोप व आभार श्रीमती अलका साबळे यांनी केले असल्याची माहिती श्री दिलीप गाडेकर वृत्तपत्र लेखक सामाजिक कार्यकर्ता धारावी मुंबई यांनी सांगितले

संबंधित पोस्ट

नागरी भागातील बालाकांच्या सुपोषणासाठी नागरी बाल विकास केंद्र उपयुक्त- मंत्री आदिती तटकरे,सुपोषित मुंबई अभियान व नागरी बाल विकास केंद्र योजनेचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

स्वच्छता जनजागृती मोहीम — राजमाता जिजाऊ रुग्णालय, ऐरोली

लातूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत शौर्य दिन उत्साहात साजरा

भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला.

अल्पसंख्याक विकास विभागाद्वारे ‘गेटवे ऑफ इंडिया’ समोर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

कुंडलिका नदीवरील पुलाच्या कामामुळे 27 जुलैपासून जड वाहनांना प्रवेशबंदी; 30 सप्टेंबरपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर अनिवार्यमोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश जारी…