vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एस टी महामंडळाची NCMC स्मार्ट कार्ड सेवा-सवलतधारी प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती

एस टी महामंडळाची NCMC स्मार्ट कार्ड सेवा-सवलतधारी प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती

सातारा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ( एसटी) मार्फत विविध प्रवासी सवलतींचा लाभ देण्यात येत असून यासाठी पूर्वी हस्तलिखीत पास दिले जात होते. मात्र आता सवलतधारी प्रवाशांसाठी वार्षिक किलोमीटर मर्यादा व प्रति प्रवास किलोमीटर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

 त्यानुसार सध्या प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) सवलत स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्यात आली आहे. स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया सुरुएसटी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजी प्रा. लि. आणि एनएसडीएल पेमेंट बँक यांच्या सहकार्याने स्मार्ट कार्ड वितरण सुरू केले आहे. सातारा विभागात बसस्थानकांसह विविध ठिकाणी कंपनीकडून नेमलेल्या खाजगी एजंटांमार्फत नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कार्ड शुल्क निश्चित-नवीन NCMC सवलत कार्ड नोंदणीसाठी रु. १९९/- इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या शुल्कामध्ये संपूर्ण प्रकल्प कालावधीतील देखभाल व इतर खर्चांचा समावेश आहे.

प्रवाशांसाठी सूचना-प्रवाशांनी एसटी महामंडळाने निश्चित केलेल्या रु. १९९/- व्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त रक्कम देऊ नये. काही एजंटांकडून जास्त शुल्क आकारले जात असल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी तक्रार संपर्क क्रमांक,श्री. सर्वेश घाडगे – 8007861519श्री. विकास चव्हाण (विभागीय प्रतिनिधी) – 7738087123००००

संबंधित पोस्ट

दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तुंच खरेदी करून त्यांना प्रोत्साहित करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन- प्रदर्शनात 13 शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग, वस्तू विक्रीतून 31 हजार जमा…

पर्यटन क्षेत्राच्या प्रचार व ब्रँडिंगसाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय…

शेगांव तालुक्यातील अवसायनातील आठ संस्थांची नोंदणी रद्द होणार; आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

म्हाडातर्फे सदनिकांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन26 सप्टेंबर रोजी लॉटरीची सोडत मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांची माहिती..

बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्ग अनुभव’

आज तब्बल ५ हजार ३५४ घरे व ७७ भूखंडाच्या संगणकीय सोडतीद्वारे घराचे स्वप्न झाले साकार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत–२०२५ संपन्न

vishwatmaklokswamivarta