vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात ७३.६९ टक्के मतदारांचे मॅपिंगचे काम पूर्ण; मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश

जिल्ह्यात ७३.६९ टक्के मतदारांचे मॅपिंगचे काम पूर्ण; मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अंतर्गत जिल्ह्यात मतदार मॅपिंगचे काम सुरू आहे. या मोहिमेत दि. २४ एप्रिल पर्यंत एकूण ३२ लाख ५१ हजार ८६२ मतदारांपैकी २३ लाख ९६ हजार ३२३ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून एकूण प्रगती ७३.६९ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे,अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधरी यांनी दिली आहे. उर्वरित काम गतिने पूर्ण करण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यात यावी असे निर्देशही देण्यात आले.

 विधानसभा मतदारसंघनिहाय प्रगतीमध्ये सिल्लोड (८६.३९%), कन्नड (८९.८०%), फुलंब्री (६९.६८%), औरंगाबाद मध्य (५४.९०%), औरंगाबाद पश्चिम (५८.८५%), औरंगाबाद पूर्व (५८.०८%), पैठण (८२.२१ %), गंगापूर (७७.५७%) आणि वैजापूर (९२.५३%) अशी नोंद झाली आहे.

 या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सविता चौधरी यांनी नायब तहसीलदार निवडणूक यांची बैठक घेतली. बैठकीत प्रत्येक मतदारसंघातील प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या ठिकाणी प्रगती कमी आहे, तेथे विशेष लक्ष देऊन काम गतीमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 मतदार मॅपिंग मोहिमेत जनजागृती व लोकसहभाग वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक तसेच बूथ लेव्हल एजंट (BLA) यांचा सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवून शंभर टक्के मॅपिंग पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.

 ज्या भागांमध्ये कामाची गती मंद आहे, तेथे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन कामकाज वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासनाकडूनही प्रत्यक्ष फिल्ड भेटी घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 दरम्यान, नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून मतदान मॅपिंग प्रक्रियेसाठी घरी येणाऱ्या बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांना अचूक माहिती द्यावी, तसेच सन २००२ मधील मतदार यादीत आपला समावेश कोठे होता याची माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

राज्य विधानसभा निवडणुका | दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे मतदान टक्केवारी 📊 तामिळनाडू – 56.81% पश्चिम बंगाल (पहिला टप्पा) – 62.18% टक्के मतदान…

दादर धुरु हॉलमध्ये मराठी भाषा दिवस कार्यक्रम 

vishwatmaklokswamivarta

राज्यात शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये १६ जून रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’आदिवासी विकास विभागाचा अभिनव उपक्रम – मंत्री डॉ. अशोक वुईके आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी बहुआयामी प्रयत्न

चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात 21 ते 24 मे 2025 दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई

vishwatmaklokswamivarta

एव्हीजीसी – एक्स आर’ धोरणात मराठी चित्रपट निर्मितीचा समावेश करावा- उद्योग मंत्री उदय सामंत

वाद्यरंग’ सांस्कृतिक कार्यक्रमातून सांस्कृतिक कार्य विभागाचा वाद्यजागर; ७५ पेक्षा जास्त दुर्मिळ व पारंपरिक वाद्याचे प्रदर्शन ‘स्वराज्य की शपथ’ टपाल तिकीटाचे व महात्मा गांधी संकलित वाङ्मय- भाग २ चे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta