vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालया च्याजागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच :- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालया च्याजागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच :- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

            मुंबई, प्रतिनिधी : अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता. मात्र, संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचे निदर्शनास आल्याने हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केला. या चर्चेत सदस्य बच्चू कडू, अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला. या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

     मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, वनविभागाच्या मंजुरीनंतरच या जागेबाबत अंतिम निर्णय होणार असून, तोपर्यंत जागा बदलण्याचा किंवा अन्य पर्यायाचा विचार करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्यानंतर व अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

       ते म्हणाले की, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) निकषांनुसार वैद्यकीय महाविद्यालयासाठी ५०० खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे; तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असल्याने हे महाविद्यालय अमरावती शहर किंवा परिसरातून अन्यत्र हलविणे शक्य नाही.

       वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी; तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी

संबंधित पोस्ट

शांताई सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवनोपयोगी साहित्य वाटप

सण-उत्सव एकोप्याने साजरे करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची सभा

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अलिबाग येथे ‘जागो ग्राहक जागो’ पथनाट्याद्वारे जनजागृती

vishwatmaklokswamivarta

आरोग्य यंत्रणांचा आढावा दिवाळी आरोग्यदायी व्हावी यासाठी खबरदारी घ्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड मधील भव्य कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशीकार्यक्रमासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना – सचिव रुचेश जयवंशी

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन