vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कुंभमेळ्यासाठी मराठवाड्यातील भाविकांना विशेष रेल्वेची सुविधा*माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पाठपुराव्यास यश!*

कुंभमेळ्यासाठी मराठवाड्यातील भाविकांना विशेष रेल्वेची सुविधा*माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पाठपुराव्यास यश!*

 

जालना ( प्रतिनिधी) : बारा वर्षांनी येणाऱ्या हिंदू धर्मातील पवित्र महाकुंभ पर्वासाठी जाण्याकरिता मराठवाड्यातील भाविकांना विशेष रेल्वे उपलब्ध करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने रेल्वेमंत्री अश्विनीकुमार यांनी विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

प्रयागराज ( उत्तर प्रदेश )येथील कुंभ मेळाव्यात जाण्याकरीता नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद , काचीगुड-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद विशेष रेल्वे प्रयागराज छिवकी मार्गे चालविण्यात येत आहेत. यात

गाडी क्रमांक 07721 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी रात्री 11.00 वाजता सुटेल पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07722 पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 03.30 वा. सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील. गाडी क्रमांक 07725 काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी दुपारी 04:45 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07726 पटणा ते काचीगुडा मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे सकाळी 07:00 वा.पोहोचेल.

गाडी क्रमांक 07099 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर,जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07100 पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 03.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.

 गाडी क्रमांक 07101 औरंगाबाद- पटणा ही विशेष गाडी औरंगाबाद येथून दिनांक 19 फेब्रुवारी 2025 आणि 25 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 07.00 वा. सुटेल आणि जालना, सेलू ,परभणी,पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर,जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07102 पटणा ते औरंगाबाद विशेष गाडी पटणा येथून दिनांक 21 फेब्रुवारी 2025 आणि 27 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 03.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच औरंगाबाद येथे अनुक्रमे दिनांक 23 फेब्रुवारी 2025 आणि दिनांक 29 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 07.45 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.

गाडी क्रमांक 07103 काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 04:45 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

 गाडी क्रमांक 07104 पटणा ते काचीगुडा मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2025 सकाळी 07:00 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.

गाडी क्रमांक 07105 सिकंदराबाद ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी सिकंदराबाद येथून दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 05.00 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर,खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07106 पटणा ते सिकंदराबाद मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 09 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 03:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच सिकंदराबाद येथे दिनांक 11 फेब्रुवारी 2025 सकाळी 11:30 वाजता पोहोचेल. या गाडीत 20 डब्बे असतील. असे सांगून भाविकांनी मोठ्या संख्येने या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन रावसाहेब पाटील दानवे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाशिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

शासन व पोलिसांचे कार्य जनतेची सेवा करणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६९वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा

शासकीय संस्थेची नूतन इमारत म्हणजे मुलांच्या आयुष्यामध्ये पर‍िवर्तन घडवणारी वास्तू – पालकमंत्री नितेश राणे शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे उद्घाटन

अमरनाथ यात्रेच्या तयारीला वेग देण्यासाठी व यात्रा सुरळीत पडावी यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आज एक आढावा बैठक

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी कार्यवाही करावी— ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

राज्याच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अबूधाबी पोर्ट्स ग्रुपसोबत दोन अब्ज डॉलर्सचा सामंजस्य करार राज्याच्या सागरी उद्योग क्षेत्राची नवी भरारी

vishwatmaklokswamivarta