vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्या

महिलांसाठी ‘सशक्त’ अभियान

महिलांसाठी ‘सशक्त’ अभियान

राज्य प्रतिनिधी –

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानाच्या माध्यमातून महिलांना निरोगी, सशक्त आणि आत्मनिर्भर करण्याचा निर्धार केला आहे. या अभियानाविषयी ही माहिती….महिलांना त्यांच्या घराजवळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे तसेच त्यांना अधिक निरोगी, सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे या उद्देशाने देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान राबविण्यात येत आहे.

महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी इंदौर, मध्य प्रदेश येथे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झाला असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरात सर्वत्र करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील शुभारंभ सोहळा 17 सप्टेंबर 2025 रोजी राज्यभर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मान्यवर या सोहळ्यास बीड येथून ऑनलाईनही सहभागी झाले आहेत.

अभियानाची उद्दिष्ट्ये,या अभियानाचा मुख्य उद्देश देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये महिला आणि मुलांसाठी तपासणी व विशेषज्ञ आरोग्य शिबिरांचे आयोजन आयुष्यमान आरोग्य मंदिरांमध्ये दररोज तपासणी आणि जनजागृती शिबिरांचे आयोजन ग्रामीण रुग्‍णालये/उपजिल्‍हा रुग्‍णालये आणि प्राथमिक आरोग्‍य केंद्रे येथे विशेषज्ञाव्‍दारे तपासणी शिबिरांचे आयोजन खासगी महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना संलग्‍नीत रुग्‍णालये व क्लिनिक येथे देखील विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

या शिबिरांमध्ये विविध आरोग्य सेवा पुरवल्या जातील, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:महिलांची आरोग्‍य तपासणी:-

उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्‍या निदानासाठी तपासणी करणे. तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्‍या निदानासाठीची तपासणी करणे. जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग तपासणी किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया (रक्तक्षय) तपासणी आणि समुपदेशन. आदिवासी भागातील महिलांसाठी सिकल सेल तपासणी कार्ड वाटप आणि आदिवासी भागात सिकल सेल आजाराबाबत समुपदेशन.

माता आणि बाल आरोग्‍य सेवा,गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी, तपासणी व समुपदेशन, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन, बालकांचे आवश्‍यकतेनुसार लसीकरण.

आयुष सेवा या अंतर्गत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिध्‍द व नॅचरोपॅथी इ. पर्यायी उपचार पध्‍दतींची सेवा गरजू रुग्‍णांना उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे.जनजागृती आणि वर्तणूक बदल संवादकिशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्रे महिला बचत गट आणि पंचायत प्रतिनिधींच्या माध्यमातून खाद्यतेल आणि साखरेचा वापर कमी करण्यावर समुपदेशन. पोषण विषयी समुपदेशन व निरोगी राहण्‍यासाठी मार्गदर्शन

रक्तदान शिबीरे१ ऑक्‍टोबर हा राष्‍ट्रीय स्‍वेच्‍छा रक्‍तदान दिन असून त्‍याअनुषंगाने राष्‍ट्रीय महास्‍वेच्‍छा रक्‍तदान या अभियानात राबविण्‍यात येईल. इंडियन रेड क्रॉस सोसायटी, अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद इ. संस्‍थांच्‍या साहायाने १ लाख युनिट रक्‍त गोळा करण्‍याचे ध्‍येय असून, रक्‍तदात्‍यांची नोंदणी करण्‍याचेही प्रस्‍तावित आहे. My Gov पोर्टलद्वारे रक्‍तदान प्रतिज्ञा उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल.

नोंदणी आणि कार्ड वाटप,आयुष्‍यमान भारत डिजीटल मिशन कार्ड, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणी व आयुष्‍यमान वय वंदना कार्ड वाटप सर्व गरजू व पात्र लाभार्थ्‍यांना करण्‍यात येईल.क्षयरोग निर्मुलनासाठी निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी

संबंधित पोस्ट

मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यां चे इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत होणार प्रयाण

श्री गुरु तेग बहादूर यांच्या विचार, कार्यावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे शुक्रवारी बक्षीस वितरण…

मुंबईतील गृहसंकुल पुनर्विकासासाठी महाप्रीत – एनबीसीसी यांच्यात सामंजस्य करार..

अमरावती शहरात ५ सप्टेंबर रोजी वाहतूक नियमांमध्ये बदल..

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला-सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार

vishwatmaklokswamivarta