vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

देगलूरच्या न्यायप्रवासाला नवे अधिष्ठान -देगलूर नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन संपन्न

देगलूरच्या न्यायप्रवासाला नवे अधिष्ठान -देगलूर नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन संपन्न

नांदेड प्रतिनिधी :- देगलूर शहराच्या न्यायइतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्या नूतन न्यायालयीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज अत्यंत शिस्तबद्ध व सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीपकुमार सी. मोरे यांच्या शुभहस्ते या भव्य इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील ग. वेदपाठक हे होते. तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नीरज पी. धोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सन 1920 पासून न्यायदानाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागेवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशस्त व सुसज्ज न्यायालयीन कक्ष, अभिवक्ता संघासाठी स्वतंत्र व सुसंस्कृत बार असोसिएशन तसेच नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त अशी ही बांधण्यात आलेली भव्य इमारत आता न्यायसेवेसाठी खुली करण्यात आली आहे

या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रक दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) राघवेंद्र नरहरराव देव तसेच देगलूर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. विरेंद्र नागनाथ पाटील यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उद्घाटन सोहळा नियोजित वेळेत व अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नांदेड येथील दिवाणी न्यायाधीश इंदूरकर यांनी केले. या कार्यक्रमास नांदेड, बिलोली, देगलूर येथील विधिज्ञ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, वकील तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या नूतन न्यायालयीन इमारतीचे सामाजिक व न्यायालयीन महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.

न्यायालयीन इमारत ही केवळ भौतिक रचना नसून ती न्याय, संविधान आणि लोकशाही मूल्यांची सजीव प्रतिमा असते. देगलूरमध्ये उभी राहिलेली ही नूतन न्यायालयीन इमारत पुढील अनेक दशकांपर्यंत न्यायाच्या प्रकाशाचा दीपस्तंभ ठरेल, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

००००००

संबंधित पोस्ट

वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्राबार कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नेपाळ-तिबेट पूर आपत्ती : महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४X७ समन्वय,बेपत्ता नागरिकांच्या शोध व ओळखीसाठी केंद्र व राज्य यंत्रणांशी सातत्याने समन्वय…

vishwatmaklokswamivarta

काम नाही, वेतन नाही’ शासन निर्णय रद्द करा-आमदार सुधाकर अडबाले यांची आदिवासी विकास मंत्र्यांकडे बैठकीत मागणी आश्रमशाळा शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्‍या निवारणार्थ मुंबईत सभा

vishwatmaklokswamivarta

दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, सुमारे ४३ लाख रोजगारनिर्मिती – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्त..वाघ, बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी ‘एआय’ यंत्रणा पेंच परिसरात कार्यान्वित१५ एप्रिलपर्यंत ४० ठिकाणांचे अलर्ट्स मिळणार

बुलढाणा जिल्ह्यात ‘माविम’ ठरतेय महिलांच्या आर्थिक उन्नतीचे इंजिन;४२ हजाराहून अधिक महिला झाल्या आत्मनिर्भर