vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आदिवासी आश्रमशाळेत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

आदिवासी आश्रमशाळेत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

परतूर ( प्रतिनिधी :– परतूर येथील आदिवासी आश्रमशाळेत “स्वस्थ नारी सशक्त परिवार” हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम मेरा युवा भारत, जालना व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रम हे प्रणित सांगवीकर, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

         कार्यक्रमाला आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या परतूर तालुका समन्वयक अमृता ठाकुर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रस्तावना मांडली. प्रमुख मुख्याध्यापक श्री. एस. बी. जाधव यांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. मुसळे सर तसेच अधीक्षिका श्रीमती पल्लवी अनकर यांचे विशेष योगदान लाभले.

         सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थिनींना अमृता ठाकूर यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. या सत्रामध्ये मुलींच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. मासिक पाळी स्वच्छता, पोषण, मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास वाढविण्याविषयी संवाद साधला गेला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुलींनी रंगीबेरंगी व आकर्षक रांगोळ्या काढून आपली कलात्मकता आणि सर्जनशीलता सादर केली.  कार्यक्रमाला आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित पाहुण्यांनी व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

संबंधित पोस्ट

सर्व विभागांनी समन्वयाने महिलांच्या समस्या सोडवाव्यात- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बारावी जीवशास्त्रची परीक्षा जिल्ह्यातील 109 परीक्षा केंद्रावर सुरळीत : जिल्हाधिकारी राहूल कर्डिले· कंधार तालुक्यात पानभोसी केंद्रावर पेपर संपेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती· जिल्ह्यात 98.24 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती  जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या भरारी पथकामार्फत निगरानी…

झुडपी जंगलावरील जमिनीबाबत समन्वयाने कामाला गती द्या – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहितीआपत्कालीन प्रतिसादासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना तत्पर राहण्याच्या सूचना…

पर्यटनातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याची संधी– मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे

वेरुळ येथील ज्योतिर्लिंग घ्रुष्णेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा-महाशिवरात्र यात्रा; वाहतुक मार्गात बदल

vishwatmaklokswamivarta