vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रम; शहाजीराजे भोसले जयंतीनिमित्त‘स्वराज्य संकल्प महोत्सवाचे सोमवारी (दि.२७) भव्य आयोजनलोककलावंतांच्या सादरीकरणातून स्वराज्य संकल्पाचा प्रेरणादायी इतिहास उलगडणार…

सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रम; शहाजीराजे भोसले जयंतीनिमित्त‘स्वराज्य संकल्प महोत्सवाचे सोमवारी (दि.२७) भव्य आयोजनलोककलावंतांच्या सादरीकरणातून स्वराज्य संकल्पाचा प्रेरणादायी इतिहास उलगडणार…

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या ४३२ व्या जयंतीनिमित्त ‘स्वराज्य संकल्प महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून स्वराज्याच्या संकल्पनेचा इतिहास, परंपरा आणि प्रेरणादायी विचार लोककलेच्या माध्यमातून सादर केले जाणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी भोंडवे पाटील प्रांगण, छत्रपती संभाजीनगर येथे सायं. साडेसहा वा.आयोजित करण्यात आला आहे.

स्वराज्य संकल्प महोत्सव’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून, स्वराज्याच्या उदात्त विचारांची नव्या पिढीपर्यंत पोहोच घडविणारा आणि समाजात देशभक्ती, शौर्य व स्वाभिमान या मूल्यांची जाणीव निर्माण करणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. सुमारे ५० लोककलावंतांच्या सहभागातून सुसज्ज व नेत्रदीपक वीरश्रीप्रधान कलाप्रदर्शन सादर केले जाणार असून, प्रेक्षकांना इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा मिळणार आहे.

हा कार्यक्रम सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी भोंडवे पाटील प्रांगण, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात विविध लोककला प्रकारांच्या सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा प्रभावी आविष्कार सादर होणार आहे.

सदर कार्यक्रम सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभाग सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव करण्याचा प्रयत्न यामधून करण्यात येत आहे.

सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य ठेवण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय बिभीषण चवरे यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी !

vishwatmaklokswamivarta

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईत निधन, संगीत क्षेत्रातील चिरतरुण सूर हरपला, सर्वत्र शोकभावना.♦️आशा भोसले यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा केली — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 

आरटीई’ प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा 4 प्रवेश फेरी सुरु कागदपत्र पडताळणीसाठी शिक्षणाधिकारी यांचे पालकांना आवाहन

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश