vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ डिसेंबर २०२६ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेची निवडयादी व गुणयादी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mecenmms.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (एनएमएमएस) विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांची यादी २४ फेब्रुवारी रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना, पालकांना शाळेमार्फत जात, दिव्यांगत्व जन्म दिनांक आदी बाबतची दुरुस्ती असल्यास परिषदेकडे ऑनलाईन पाठविणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी, पालकांनी शाळेमार्फत पाठविलेल्या दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे

या परीक्षेसाठी २ लाख ५० हजार ७४५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११ हजार ६८२ शिष्यवृत्ती कोटा शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते, तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे ७ वी व ८ वीची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे

परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (योजना) व शिक्षण संचालक (योजना) यांच्यामार्फत केले जाते, असे आयुक्त महेश चौथे यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

चित्रपट उद्योगासाठी प्रोत्साहन धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार,राज्यात नवीन फिल्म सिटी, सिंगल विंडो क्लिअरन्स आणि आधुनिक चित्रीकरण सुविधांवर भर

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-विदर्भात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड संस्थेचे सहकार्य..

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

vishwatmaklokswamivarta

५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चार आरोपींना अटक..

vishwatmaklokswamivarta

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात.

राज्यभरात एफडीएची औषधांवरील आक्षेपार्ह जाहिराती व मिसब्रँडेड औषधसाठ्यांविरुद्ध धडक मोहीम अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती