vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिल्या शुभेच्छा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिल्या शुभेच्छा,भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

नवी दिल्ली प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आदिवासी संस्कृतीने समृद्ध असलेली झारखंड ही एक वैभवशाली भूमी आहे ,असे पंतप्रधान म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांच्या वारशाचे स्मरण करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, या पवित्र भूमीचा इतिहास धैर्य, संघर्ष आणि प्रतिष्ठेच्या प्रेरणादायी कथांनी भरलेला आहे.या विशेष प्रसंगी पंतप्रधानांनी राज्यातील सर्व कुटुंबांच्या प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. जनजाति गौरव दिनाच्या पवित्र प्रसंगी, संपूर्ण राष्ट्र मातृभूमीच्या सन्मान आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाचे कृतज्ञतेने स्मरण करते असे ते म्हणाले. परकीय राजवटीतील अन्यायाविरुद्ध भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष आणि बलिदान येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,आदिवासी संस्कृतीने समृद्ध असलेल्या गौरवशाली झारखंडच्या सर्व रहिवाशांना राज्याच्या स्थापना दिनानिमित्त खूप खूप अभिनंदन. भगवान बिरसा मुंडांच्या या भूमीचा इतिहास धैर्य, संघर्ष आणि स्वाभिमानाच्या कथांनी भरलेला आहे.या खास प्रसंगी, मी, माझ्या सर्व कुटुंबातील सदस्यांसह, राज्याच्या प्रगती आणि समृद्धीची कामना करतो.”

संबंधित पोस्ट

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावेजिल्ह्यातील मंडळांना ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दूरसंचार सल्लागार समितीची बैठक संपन्न – BSNL सेवांसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय

नंदूरबार जिल्ह्यातल्या देवगुई घाट परिसरात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केलं. जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थींची मंगळवारी निवडजिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थितीचे

कुळगाव बदलापूर नक्शा प्रकल्प

vishwatmaklokswamivarta

शेतकरी केंद्रस्थानी ठेवुन बाजार समित्यांनी सुविधा पुराव्यात  -जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रीक