vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणावर भर-दादाजी भुसे शिक्षण विभागाच्या शासकीय शाळांचा सर्वंकष आढावा

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणावर भर-दादाजी भुसे शिक्षण विभागाच्या शासकीय शाळांचा सर्वंकष आढावा

मुंबई, प्रतिनिधी: शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, सैनिकी शाळा, शासकीय विद्यानिकेतन आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. या अनुषंगाने या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे, सोयी सुविधा, विद्यार्थ्यांची प्रवेश स्थिती अभ्यासाचे मूल्यमापन याबाबत त्यांनी मंत्रालयात मंगळवारी आयोजित बैठकीत सविस्तर आढावा घेतला.

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक, विभागातील वरिष्ठ अधिकारी; तसेच संबंधित संस्थांचे प्राचार्य आणि कार्यालय प्रमुख यावेळी उपस्थित होते.

शिक्षक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मंजूर, कार्यरत व रिक्त पदांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. याचबरोबर विविध संस्थांच्या इमारतींची सद्यस्थिती, शासनाकडून मंजूर झालेल्या अनुदानाचा वापर, खर्च व शिल्लक निधी, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची सद्यस्थिती, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, मूल्यमापन प्रक्रिया तसेच विविध योजनांच्या प्रगतीचा मंत्री दादाजी भुसे यांनी सविस्तर आढावा घेतला.

ज्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय विद्यालयांच्या शाळा नाहीत तेथे त्या सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांनी परिसरातील इतर शाळांमधून प्राथमिक प्रशिक्षण द्यावे, शासकीय विद्यानिकेतनमधील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना मंत्री भुसे यांनी यावेळी दिल्या.

सर्व संस्थांमध्ये सुरू असलेल्या सोयी-सुविधांच्या कामांना अधिक गती देत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे सांगून मंत्री भुसे यांनी विद्यार्थीहित, शैक्षणिक गुणवत्ता आणि संस्थांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

००००

संबंधित पोस्ट

गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आज ठाणे स्टेशन येथे गिरणी कामगार संयुक्त लढा समिती वतीने ठाण्यात “स्मरण मोर्चा..

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा – खासदार डॉ. नामदेव किरसान‘दिशा’ समितीची आढावा बैठक संपन्न; विकासकामांना गती देण्याचे निर्देश

अग्निवीर वायू योजनेसाठी करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील    -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

सातारा जिल्ह्यातील ‘साखरवाडी’ आणि पुणे जिल्ह्यातील ‘कुंजीरवाडी’ गावांना जैवविविधता संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी

vishwatmaklokswamivarta