vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अग्निवीर वायू योजनेसाठी करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन..

अग्निवीर वायू योजनेसाठी करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन..

 

जालना, प्रतिनिधी :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जे.ई.एस. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय वायू सेनाकडून अग्निवीर वायू योजना करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन मंगळवार दि. 28 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता जालना येथील जे.ई.एस. महाविद्यालयात करण्यात आले आहे. तरी जालना जिल्ह्यातील सर्व युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांनी केले आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना विविध शासकीय, निमशासकीय खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आदि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मॉडेल करिअर सेंटरच्या वतीने विशेष मोहिम जालना जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. यामध्ये युवक-युवतींना करिअर समुपदेशन तथा रोजगार स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यात येत असते. याच मोहिमेचा भाग म्हणून भारतीय वायू सेनेचे एन.एस.शेखावत तसेच आखिल एस. हे या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन सत्रात भारतीय वायूसेनेमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना विविध रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन करणार येणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नरक चतुर्दशी-दीपावली म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. सबंध भारत देशातच नव्हे तर जगात..

vishwatmaklokswamivarta

आज गेट ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण सेंटरपर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे या दिंडीला हिरवा झेंडा दाखवला.

vishwatmaklokswamivarta

वारसा जतनाची प्रेरणा श्रीक्षेत्र मार्कंडातून…जागतिक वारसा दिनानिमित्त उपक्रम

जिल्हा पाणी स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

महापारेषणला पॉवर ट्रान्समिशन पुरस्कार प्रदान अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta