vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

 

            जालना, प्रतिनिधी :- ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जालना जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा संघटना, शैक्षणिक संस्था, क्रीडा मंडळ, एकविध खेळ संघटना, क्रीडा अकादमी, संस्था व मंडळाच्या माध्यमातून राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा व उपक्रम दि.15 व 16 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आले.

 राज्य क्रीडा दिनानिमित्त बुधवार दि. 15 जानेवारी 2025 रोजी व्याख्यान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार व गौरव, क्रीडा क्षेत्रातील संधी, नामवंत खेळाडूसोबत संवाद, फुटबॉल स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा, तलवारबाजी स्पर्धा, योग स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, लॉन टेनिस स्पर्धा, टेनिक्वाईट स्पर्धा घेण्यात येवून पुरस्कार वितरण करण्यात आले. तर गुरुवार दि.16 जानेवारी रोजी रॅलीसह मॅरेथॉन स्पर्धा तसेच विविध क्रीडा अकादमींना भेटी देण्यात आल्या आहेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत  प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने संडे ऑन सायकल फिटनेस का डोस या आधा घंटा रोज सायकल रॅलीचे आयोजन

नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये 93 संघांचा उत्स्फुर्त उत्साही सहभाग…

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जलसंपदा विभागाच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन

नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय ‘व्हॉलीबॉल’ स्पर्धेला नवी मुंबईतील शाळा – महाविद्यालयांचा भरघोस प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत कुस्ती व लॉन टेनिसविभागीय निवड चाचणी दि.२३ रोजी