vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत कुस्ती व लॉन टेनिसविभागीय निवड चाचणी दि.२३ रोजी

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत कुस्ती व लॉन टेनिसविभागीय निवड चाचणी दि.२३ रोजी

 

 छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी  व युवक सेवा संचालनालयामार्फत विभागीय क्रीडा निपुणता केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन होत आहे. त्यातील लॉन टेनिस व कुस्ती या खेळाच्या विभागस्तरीय खेळाडू निवड चाचणीचे आयोजन गुरुवार दि.२३ रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे होत आहे. इच्छुक व पात्र खेळाडूंनी उपस्थित रहावे,असे आवाहन क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी केले आहे.

 क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत ‘मिशन लक्ष्यवेध योजना’ ही धोरणात्मक योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत लॉन टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन आणि बॉक्सिंग या क्रीडा प्रकाराकरिता विभागीय क्रीडा निपुणता केंद्र विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यात येत आहे. या केंद्रांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना निवासी स्वरूपात दर्जेदार व तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, निवास व भोजन सुविधा तसेच क्रीडा विज्ञान विषयक सहाय्य, देश विदेशातील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग व खेळाडूंसाठी वैद्यकीय विमा सुरक्षा सुविधा शासन मान्यतेनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विभागीय क्रीडा निपुणता केंद्र, विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने लॉन टेनिस आणि कुस्ती या क्रीडा प्रकाराच्या विभागस्तरीय खेळाडू निवड चाचणीचे आयोजन गुरुवार दि.२३ रोजी चाचणी आयोजीत करण्यात आल्या आहेत.

निवडचाचणी करिता निकष खालीलप्रमाणे:लॉन टेनिस : वयोमर्यादा-२५ वर्षाआतील मुले/मुली (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी), आवश्यक कागदपत्रे- जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत 2 वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटोग्राफ तीन, शाळा / महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकाचे संमती पत्र इ., अधिवास- महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे, क्रीडा कामगिरी विवरण-Top 3 Rank Players in AITA, National Ranking Player, राज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावरील सहभागी खेळाडू (SGFI, AITA, Khelo India National Only) गत २ वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती (Fitness) चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक, शासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य.कुस्तीः वयोमर्यादा-२५ वर्षाआतील मुले/मुली (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी), आवश्यक कागदपत्रे- जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत 2 वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटोग्राफ 03, शाळा / महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकाचे संमती पत्र इ., अधिवास- महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे, क्रीडा कामगिरी विवरण-राज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावरील सहभागी खेळाडू (SGFI, WFI, Khelo India National Only) गत २ वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती (Fitness) चाचण्यांमध्ये पात्र होणे, शासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य.

निवड चाचणीचे ठिकाण :विभागीय क्रीडा संकुल, सुतगिरणी चौक, छत्रपती संभाजीनगर-४३१००९

निवड चाचणीची वेळ: सकाळी १०.०० वाजता पासून ,उपस्थिती : सकाळी ९.३० वाजता संपर्क क्रमांक: श्री. तेजस कुलकर्णी (क्रीडा अधिकारी) ८०८७६६१५८९  इच्छुक व पात्र खेळाडूंनी आवश्यक कागद्पत्रांसह उपस्थित रहावे,असे आवाहन क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

नयना गुंडे यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्विकारला

छत्रपती संभाजीनगर येथे 7 सप्टेंबरला डाक अदालत डाक सेवेसंदर्भातील तक्रारी 4 सप्टेंबरपूर्वी पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दिल्लीचे उपमुख्यमंत्री परवेश वर्मा यांनी घेतले महाराष्ट्र सदनातील ‘ श्री ‘ चे दर्शन गणेश विसर्जनासाठी दिल्ली सरकारकडून ८५ कृत्रिम तलाव – परवेश वर्मा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी

पाथ्रीकर कॅम्पस बदनापुर येथे भारतीय जनऔषधी दिवस कार्यक्रम संपन्न

संत गाडगे बाबांना आदरांजली!

vishwatmaklokswamivarta