vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी

 

लातूर, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यासाठी ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना रिलायन्स इंडस्ट्रीज, एच.डी.एफ.सी. बँक आणि गेल (इंडिया) लिमिटेड यांसारख्या देशातील आघाडीच्या २००० कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना प्रतिमहा ९ हजार रुपये स्टायपेंड दिला जाणार असून, ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

या योजनेसाठी १८ ते २५ वयोगटातील इयत्ता १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर असलेले बेरोजगार तरुण पात्र आहेत. केवळ मानधनच नव्हे, तर प्रशिक्षणार्थींना ६ हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षणही दिले जाणार आहे.

सध्या या योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला असून, इच्छुकांनी तात्काळ https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्री. नि. ना. सूर्यवंशी यांनी केले आहे. मदतीसाठी तरुण दत्तात्रय कांबळे (९०२८२३८४६५) किंवा लहू भंडारे (८०५५९९२९००) यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

*****

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील नव वर्ष स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेच्या चित्ररथास उत्स्फूर्त प्रतिसाद…

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’- विभागीय आयुक्त नयना गुंडे• विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन

विधानसभा लक्षवेधी सूचना :विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्याची केंद्राकडे मागणी- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सुभेदारीच्या व्हीव्हीआयपी सुट चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत सात पर्यटनस्थळे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय, जम्मू-काश्मीरमधील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सुरु

रा. सू. गवई स्मारक उद्घाटनासाठी सज्ज*अमरावतीत उभे राहिले भव्य स्मारक*जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा

vishwatmaklokswamivarta