vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कर्करोग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाची तपासणी-नागरिकांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

कर्करोग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाची तपासणी-नागरिकांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

 

सातारा, प्रतिनिधी: सार्वजनिक आरोग्य विभाग, स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर व्हॅनद्वारे कर्करोग तपासणी व जनजागृती अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते कर्करोग मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ महेश खलिपे, अति. शल्यचिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे आदी उपस्थित होते.

 राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कर्करोग अभिायान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर अभियानाकरिता राज्यस्तरावरुन कॅन्सर व्हॅन सातारा जिल्ह्यासाठी एक महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध झाली असून, सदर कॅन्सर व्हॅनच्या नियोजित वेळापत्रका प्रमाणे गावोगावी जाऊन तज्ञ वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत सदर भागातील नागरिकांची मोफत मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी कॅन्सर व्हॅन मध्ये करण्यात येणार आहे, याचा सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.

 या तपासणी शिबिरात आलेल्या नागरिकांना तज्ञ वैद्यकिय अधिकारी यांच्या सल्ल्याने कर्करोगाशी संबधित वैद्यकिय तपासणी, चाचण्या, निदान निश्चिती करणे, मोफत उपचार, संदर्भ सेवा व पाठपुरावा आशा सेविका, एएनएम, प्रा.आ.केंद्र यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यावेळी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर – २४३ जणांची तपासणी

रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना

vishwatmaklokswamivarta

आरोग्य – सामाजिक क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने आरोग्य सेवा तळागाळात पोहोचणार – डॉ. स्वानंद सोनारजिल्ह्यातील ६८ स्वयंसेवी संस्था, रुग्णालय प्रतिनिधींची बैठकनिरामय अहिल्यानगर अभियान’वर सविस्तर चर्चा

अमरावती जिल्हा उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज; ‘इन-क्रिस’ प्रकल्पांतर्गत उपाययोजनांना वेग..

प्राथमिक आरोग्य केंद्र, धसई येथे राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाचा आढावा व “निक्षय पोषण किट” वितरणाचा तालुका स्तरीय शुभारंभ..