vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय लोकअदालतीचे 22 मार्च रोजी आयोजन..

राष्ट्रीय लोकअदालतीचे 22 मार्च रोजी आयोजन..

सातारा, प्रतिनिधी: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्यावतीने शनिवार 22 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ परिकाम्य लेख अधिनियमाची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार अपघात दावा प्रकरणे आदी प्रकरणे अदालतसमोर ठेवण्यात आली आहे. यात न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबीत तसेच वाद दाखल पूर्व प्रकरण दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे. पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी 22 मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीसमोर मोठया प्रमाणात प्रकरणे ठेवून आपसी तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर यांनी केले आहे.
0000

संबंधित पोस्ट

विशेष लेख-महाराष्ट्रातील जनतेचा तसेच प्रशासनाचा ‘सेवा हक्क दिन’

रेल्वे स्टेशन जामा मशीद येथे दावत – ए- इफ्तारचा.पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थिती.

उन्हाळी भुईमुगावर बुरशीचा धोका; शेतकऱ्यांनो आधीच घ्या काळजी!कृषी विभागाचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता-सेवक पुरस्काराकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व महामार्ग आणि राज्य मार्ग यासह रस्त्यांवर देशी झाडांची लागवड करण्याच्या सूचना- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले झाडे जगवण्यासाठीही यंत्रणा उभारून नियमित तपासणी करणार…

मराठवाड्यात शिवसेनेचा नवा चेहरा डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर दुहेरी जबाबदारी..शिवसेना पक्ष संघटनेतील महत्वाच्या पक्ष सचिव पदा सह सहमुख्य संपर्क प्रमुख मराठवाडा (नांदेड आणि हिंगोली जिल्हा शिवसेना पक्षसंघटना) नियुक्ती करून मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा पुन्हा विश्वास